शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सहा लाखांचे हिरेजडीत दागिने लंपास करणाऱ्या मोलकरणीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:57 IST

वागळे इस्टेट येथील ज्या घरात काम केले त्याच घराच्या लॉकची चावी मिळवून सहा लाख ८५ हजारांच्या ऐवजाची चोरी करणा-या मिन्नती गौडा या मोलकरणीला वागळे इस्टेट पोलिसांनी मोठया कौशल्याने अटक केली. तिच्याकडून हा सर्व ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देओरिसाला पळून जाण्याच्या होती बेतातमुलाने चोरीतील घडयाळ घातल्याने तपासाला मिळाली दिशावागळे इस्टेट पोलिसांनी लावला छडा

ठाणे: आपल्याच मालकाच्या घरातील सहा लाख ८५ हजारांचे हिरेजडीत दागिने चोरुन ओरिसाला पळून जाण्याच्या बेतात असलेल्या मिन्नती दुर्योधन गौडा (३१, रा. ओम अयोध्या चाळ, लोकमान्यनगर, पाडा क्र मांक तीन, ठाणे) हिला वागळे इस्टेट पोलिसांनी २४ तासांमध्येच अटक केली. तिच्याकडून चोरीतील सर्वच्या सर्व सहा लाख ८५ हजारांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती वागळे इस्टेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी दिली.वागळे इस्टेट येथील रोड क्र मांक १६ येथील रहिवाशी भावेश मिर्गनानी (३७) यांच्या घरातून अज्ञात चोरटयांनी सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह सुमारे सहा लाख ८५ हजारांचा ऐवज चोरी झाल्याची घटना १ ते ३ जून दरम्यान घडली होती. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात ६ जून रोजी मिर्गनानी यांनी गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिकेत पोटे यांचे पथक या घटनेचा तपास करीत असतांनाच पोलिसांनी भावेश यांच्या इमारतीचे सीसीटीव्ही चित्रणाची पडताळणी केली. त्यात एक महिला भावेश यांच्या घरातून चोरी करुन जात असल्याचे आढळले. हीच महिला पूर्वी त्यांच्या घरात कामाला होती, अशीही माहिती समोर आली. तिचा कोणताही पत्ता उपलब्ध नसतांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लोकमान्यनगर पाडा क्रमांक तीन येथील या महिलेचा पोलिसांनी शोध घेतला. त्यावेळी तिच्या घराच्या बाहेर खेळत असलेल्या तिच्या १२ वर्षांच्या मुलाच्या हातात परदेशी बनावटीचे महागडे घडयाळ उपनिरीक्षक पोटे यांच्या पथकाला दिसले. त्यानंतर तिच्या घरात हे पथक दाखल झाले त्यावेळी ती सामानाची आवराआवर करुन ओरिसाला पळून जाण्याच्या बेतात असल्याचे उघड झाले. महिला पोलिसांच्या मदतीने मिन्नती गौडा हिची कसून चौकशी केली असता, तिने चोरीची कबूली दिली. त्यानंतर एका बॅगेतून हिरेजडीत दागिने आणि सर्व सहा लाख ८५ हजारांचा ऐवजही पोलिसांना काढून दिला. तिला या प्रकरणात ७ जून रोजी अटक करण्यात आली. ठाणे न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली.अशी केली चोरीभावेश मिर्गनानी यांच्याकडे घरकाम करणारी मिन्नती हिने त्यांच्या घराच्या कुलपाची चावी काही दिवसांपूर्वीच मिळवली होती. १ ते ३ जून या काळात ते पत्नीसह गावी गेले होते. तर सासरे रुग्णालयात दाखल असल्यामुळे घरी असलेली त्यांची सासू २ जून रोजी सकाळी १० ते १०.४० वा. च्या दरम्यान रुग्णालयात गेली. याच अवघ्या ४० मिनिटांच्या काळात तिने आधीच मिळवलेल्या चावीच्या आधारे त्यांच्या घरात डल्ला मारला. दरम्यान, १ जून रोजीच गावी जाणार असल्यामुळे यापुढे आपण कामाला येणार नसल्याचे तिने सांगितले होते. पण, २ जून रोजी ती इमारतीमधील सीसीटीव्हीमध्ये दिसल्यामुळे तिच्यावरच संशय बळावला. चौकशीत तिनेच चोरी केल्याचे उघड झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी