शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

महेश पाटील एसीबीत, शिवाजी राठोड अधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 03:26 IST

ठाणे पोलीस आयुक्तांच्या बदलीची चर्चा सध्या जोर धरत असतानात येथील काही उपायुक्तांच्या शुक्रवारी बदल्या झाल्या. यात काहींना पदोन्नतीदेखील मिळाली आहे. परंतु, या बदल्यानंतर पोलीस आयुक्तालयात अनेक महत्त्वाचे फेरबदलही झाले आहेत.

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तांच्या बदलीची चर्चा सध्या जोर धरत असतानात येथील काही उपायुक्तांच्या शुक्रवारी बदल्या झाल्या. यात काहींना पदोन्नतीदेखील मिळाली आहे. परंतु, या बदल्यानंतर पोलीस आयुक्तालयात अनेक महत्त्वाचे फेरबदलही झाले आहेत. आयुक्तालयातील एकूण सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यामध्ये अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) मकरंद रानडे यांची पदोन्नतीने नवीन झालेल्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तर, ठाणे ग्रामीणचे अधीक्षक डॉ. महेश पाटील यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.पावसाळी अधिवेशनानंतर या बदल्या होतील, अशीही चर्चा होती. मात्र, शुक्र वारी गृहविभागाने ठाणे पोलीस आयुक्तालयासह राज्यातील आयपीएस अधिकाºयांसह इतरही अधिकाºयांच्या बदल्या केल्या. ठाणे आयुक्तालयातील झोन-२चे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांना सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी धाडले आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची मुंबईत, तर झोन-५ चे उपायुक्त सुनील लोखंडे यांची नवी मुंबईत बदली झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांना नागपूर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी पाठवले आहे. विशेष शाखेचे उपायुक्त सुनील भारद्वाज यांची अकोला येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात नियुक्ती झाली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संग्रामसिंह निशाणदार यांची मुंबईत बदली झाली असून त्यांच्या जागी ठाणे ग्रामीणचे अधीक्षक डॉ. महेश पाटील यांना आणले आहे.ठाणे आयुक्तालयातही काही नवे अधिकारी बदली होऊन आले आहेत. यात एस.एस. बुरसे (पोलीस उपायुक्त, मुंबई), दीपक देवराज (पोलीस उपायुक्त, मुंबई), अविनाश अंबुरे (सहायक पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था), पी.पी. शेवाळे (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग), संजय जाधव (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, नवी मुंबई) यांचा समावेश आहे. तर, पदोन्नती देऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपमहानिरीक्षक के.जी. पाटील ठाण्याच्या अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) पदी आले आहेत.- नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त प्रवीण पवार यांची अपर आयुक्त (गुन्हे, ठाणे) या पदी नियुक्ती केली. नव्याने ठाणे पोलीस येथे दाखल झालेले अधिकारी गुन्हेगारी रोखण्यासाठी कसा प्रयत्न करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय, लातूरचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांची ठाणे ग्रामीण अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Policeपोलिसthaneठाणे