शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

महावितरणच्या कर्मचाऱ्याला ग्राहकाची मारहाण; नाैपाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा

By जितेंद्र कालेकर | Updated: October 5, 2023 22:38 IST

कारवाईची मागणी

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : दोन महिन्यांचे वीजबिल थकविणाऱ्या ग्राहकाला ते भरण्याचे आवाहन करणाऱ्या महेंद्र बडगुजर (४०) या वरिष्ठ तंत्रज्ञालाच सौरभ लेले या ग्राहकाने मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेने वीज कर्मचारी आक्रमक झाले असून संबंधित ग्राहकावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. तसेच गुरुवारी सायंकाळी काही काळ काम बंद आंदाेलनही करीत या घटनेचा निषेध नाेंदविला.

वीज वितरण कंपनी वर्कर्स फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य संयुक्त सचिव निलेश्वर बनसोड यांनी दिलेल्या माहितीनुसार नौपाड्यातील विष्णूनगर भागातील जोग टॉवरमधील रहिवासी लेले यांच्या वीजबिलाची ६५ दिवसांची सहा हजार ९१५ इतकी थकबाकी आहे. ती तातडीने भरावी, अन्यथा वीज पुरवठा खंडित केला जाईल, अशी सूचना देण्यासाठी बडगुजर हे लेले यांच्या घरी गुरुवारी दुपारी गेले होते. यातूनच झालेल्या बाचाबाचीतून लेले यांनी बडगुजर यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करीत जबर मारहाण केली.

या घटनेने संतप्त झालेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नौपाडा पोलिस ठाण्यात लेले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर कडक कारवाईची तसेच अटकेचीही मागणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ काही काळ काम बंद आंदोलनही केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन याेग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी