शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"अंगावर आलेले केंद्राच्या माथी मारण्याची महाविकास आघाडीची भूमिका"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 23:57 IST

सत्ताधाऱ्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा चुकीचा

ठाणे : महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या, शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणताही निर्णय घेतलेला नाही. परिणामी, एखादा मुद्दा अंगावर आल्यास तो केंद्र सरकारच्या माथी मारण्याची भूमिका त्यांच्याकडून घेतली जात असल्याची उपरोधिक टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. त्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला.दिल्लीत शेतकऱ्यांच्या नावाखाली जे आंदोलन सुरू आहे ते मुळात त्यांच्याविरोधात असून राज्यातील सत्ताधारी याला पाठिंबा देतात हे दुर्दैवी आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना भाज्या, फळे यांची थेट विक्री करता येत होती. शेतकऱ्यांचा फायदा होत होता. ग्राहकांना रास्त भावात शेतीमाल मिळत होता. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांची दलालांच्या कचाट्यातून मुक्तता होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आज राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार या विधेयकाला विरोध करीत आहे. पण मुळात हे सरकार सत्तेवर येताच त्यांनी एपीएमसीतील शेतकऱ्यांच्या मतदानाचा हक्क हिरावला. या विधेयकातील आक्षेपाच्या मुद्द्यावर चर्चा करणे गरजेचे असताना, ते रद्द करा ही भूमिका काहींची आहे. एपीएमसीत आज शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. या विधेयकाने शेतकऱ्यांचे शोषण थांबेल, असे ते म्हणाले.या वेळी भाजपचे राज्य सचिव संदीप लेले, विलास साठे आणि मनोहर सुगदरे उपस्थित होते. 

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीBJPभाजपा