शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
4
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
5
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
6
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
7
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
8
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
10
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
11
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
12
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
13
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
14
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
15
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
16
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
17
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
20
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?

वीजसमस्या सोडवण्यासाठी महावितरणला मिळणार निधी- डॉ. शिंदे यांचा पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 02:06 IST

पूर्वेतील राजेंद्र प्रसाद रोड, चार रस्ता, रघुवीर नगर, कस्तुरी प्लाझा, रामनगर, मनोरमा सोसायटी, चंद्रमा सोसायटी या परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता.

डोंबिवली : पूर्वेतील राजेंद्र प्रसाद रोड, चार रस्ता, रघुवीर नगर, कस्तुरी प्लाझा, रामनगर, मनोरमा सोसायटी, चंद्रमा सोसायटी या परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. यासंदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेत शिंदे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. यावेळी विविध कामांसाठी निधी नसल्याचे कारण अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे शिंदे यांनी तातडीने जिल्हा नियोजन विभागाकडून निधी दिला जाईल, अशी ग्वाही दिली.रघुवीरनगर आणि रामनगरच्या काही भागांतील वीजसमस्येमुळे नागरिक हैराण असल्याचे शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी शिंदे यांना कळवले होते. तसेच कामेही कुर्मगतीने होत असून, त्यात महावितरणकडून दिरंगाई होत असल्याची तक्रार मोरे यांनी केली होती. शिंदे यांनी त्याची दखल घेत मंगळवारी महावितरणच्या अधिकाºयांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी निधी देण्यासंदर्भात चर्चा झाली. निधी वेळेत मिळाल्यास महावितरणची बहुतांशी कामे पुढील महिन्याच्या आत पूर्ण होईल, असे आश्वासन महावितरणच्या अधिकाºयांनी शिंदे यांना दिले.या बैठकीला ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, महावितरणतर्फे विभागीय संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंता सुनील काकडे, धर्मराज शिंदे, शैलेंद्र राठोड, प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते.शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे एकात्मिक ऊर्जा विकास योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना इत्यादी योजनेतून १२० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांची पूर्तता कशी व कधी होणार आहे, अशी विचारणा शिंदे यांनी अधिकाºयांना केली. त्यावर या कामांसाठी रस्ता खोदून पूर्ववत करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी केडीएमसीकडे अर्ज केला आहे. परवानगी मिळताच ही कामे सुरू करून जूनपर्यंत पूर्ण केली जातील, असे सांगितले. शिंदे यांनी केडीएमसी आयुक्त गोविंद बोडकेंना कामासाठी मंजुरी द्यावी, अशा सूचना दिल्या.>कल्याण पूर्व, अंबरनाथमध्ये होणार कामेकल्याण पूर्वेतील मेट्रो मॉल व अंबरनाथ पश्चिमेतील मोहनपूरमजवळ नवीन उपकेंद्र, २७९ नवीन ट्रान्सफॉर्मर, २२२ जुन्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे १५६ किमी लांबीची उच्च दाबाची व लघु दाबाची वाहिनी टाकणे, झंपर बदलणे, आदी तांत्रिक काम करण्यात येणार आहेत.