शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

ब्रह्मदेवाने साकारला गांधींचा जीवनपट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 03:59 IST

भार्इंदर - येथील स्थानिक व जागतिक स्तरावरील कुंभारकलेत पारंगत असलेले पद्मश्री पुरस्कारविजेते ब्रह्मदेव पंडित यांनी बिहारच्या पाटणा येथील गांधी सभागृहात सिरॅमिक म्युरलद्वारे गांधीजींचा जीवनपट साकारला.

- राजू काळेभार्इंदर - येथील स्थानिक व जागतिक स्तरावरील कुंभारकलेत पारंगत असलेले पद्मश्री पुरस्कारविजेते ब्रह्मदेव पंडित यांनी बिहारच्या पाटणा येथील गांधी सभागृहात सिरॅमिक म्युरलद्वारे गांधीजींचा जीवनपट साकारला. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांचा विशेष सत्कार करून तेथील सरकारी इमारतींत अशाच प्रकारच्या कलाकृती साकारण्याचे आमंत्रण दिले.बिहारमध्ये सध्या चंपारण सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. त्याअनुषंगाने तेथील सरकार विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीशकुमार २०१७ मध्ये मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आले असता त्यांची ब्रह्मदेव यांच्याशी भेट झाली. ब्रह्मदेव हे सुद्धा मूळचे बिहारमधील नवादा गया येथील रहिवासी असून त्यांचा जन्म कुंभार कुटुंबात झालेला आहे. पिढीजात कुंभार व्यवसायात नावीण्यपूर्ण कलाकृती साकारल्याने त्यांना १९७० मध्ये बिहारमधीलच लोकनेता जयप्रकाश नारायण आश्रमाद्वारे विशेष शिष्यवृत्ती देण्यात येऊन मुंबईच्या वांद्रे येथील कलानगर येथे पुढील शिक्षणासाठी पाठवण्यात आले. तेव्हापासून त्यांनी कुंभार व्यवसायात वेगवेगळ्या आकर्षक कलाकृती साकारून त्या जागतिक स्तरावर पोहोचवल्या. त्यांच्या या कलाकृतींची दखल घेत त्यांना २०१५ मध्येभारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवले. त्यांच्या कलाकृती राष्टÑपती भवनातील म्युझियममध्येसुद्धा पाहावयास मिळतात. त्यांच्या या कलाकृतीमुळेच नितीशकुमार यांनी त्यांना बिहारमध्ये आमंत्रित करून पाटणामधील एका सरकारी इमारतीतील गांधी सभागृहात म्युरल साकारण्यास सांगितले. त्यानुसार, ब्रह्मदेव यांनी आपला मुलगा अभय यांच्या मदतीने सुमारे ८ ते ११ महिन्यांत गांधीजींचा जीवनपट सिरॅमिकच्या तीन म्युरलवर साकारला. त्यात गांधीजींनी आपल्या आयुष्यात वापरलेला चरखा, पेन, रेल्वेगाडीतील प्रवास, पादत्राणे अशा साहित्यांसह त्यांच्यावर प्रभाव पाडणारे विनोबा भावे, रवींद्रनाथ टागोर, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. राजेंद्र प्रसाद, जयप्रकाश नारायण या महापुरुषांच्या छबी व सत्याग्रहाच्या कलाकृती साकारल्या आहेत.या कलाकृतींनी प्रभावित होऊन नितीशकुमार यांनी ब्रह्मदेव यांचा पाटणा येथील एका कार्यक्रमात विशेष सत्कार करून पुन्हा बिहारमध्ये सरकारी इमारतींत बिहारच्या संस्कृतीच्या कलाकृती साकारण्याचे निमंत्रण दिले आहे.चंपारणमध्ये सत्याग्रहब्रिटिश राजवटीत बिहारमधील चंपारणमध्ये नीळ या द्रवपदार्थाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जात होते. त्यासाठी ब्रिटिश सरकार स्थानिक शेतकऱ्यांवर त्याच्या शेतीसाठी शेतकºयांवर जबरदस्ती करत होते. यामुळे सुपीक शेतजमीन नापीक होऊ लागल्याने ब्रिटिशांच्या या जाचाविरोधात गांधीजींनी चंपारणमध्ये सत्याग्रह सुरू केला. त्याअनुषंगाने नीळयुक्त हिरव्या रंगात म्युरल साकारल्याचे ब्रह्मदेव यांनी सांगितले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीthaneठाणे