शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: युतीत ‘ठाणे शहर’ने टाकलाय बिब्बा, इच्छुकांची भाऊगर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:47 IST

युतीची घोषणा होत नसल्याने कार्यकर्त्यांच्या मनातील घालमेल वाढत असताना शिवसेनेने स्वबळाची तयारी सुरू केली आहे तर भाजपातही शतप्रतिशतची चाचपणी करीत आहे

- अजित मांडके ठाणे : युतीची घोषणा होत नसल्याने कार्यकर्त्यांच्या मनातील घालमेल वाढत असताना शिवसेनेने स्वबळाची तयारी सुरू केली आहे तर भाजपातही शतप्रतिशतची चाचपणी करीत आहे. लोकसभेत मिळालेल्या यशामुळे पक्षांत इच्छुकांची भाऊगर्दी वाढली असून ठाण्यातून उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांनी वरिष्ठ नेत्यांकडे जोडे झिजवण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर तिकीट मिळावे म्हणून आपल्या पत्नीकरवी नेतृत्वाला विनंती केल्याची माहिती आहे.ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ मिळावा यासाठी शिवसेनेची धडपड सुरु असली व युतीच्या वाटाघाटीत या मतदारसंघाने तिढा निर्माण केल्याचे बोलले जात असून भाजप कोणत्याही परिस्थितीत ठाणे शहर सोडणार नसल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. अद्याप युतीबाबत ठोस निर्णय झालेला नाही. वरिष्ठ नेते युती होणार असल्याचे सांगत असले तरी ती होऊ नये म्हणून शिवसेना आणि भाजपमधील इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत. शिवसेना-भाजपमध्ये अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. काहींनी सोशल मीडियावर प्रचारही सुरू केला आहे, काहींनी तिकीट आपल्यालाच मिळणार असा थेट दावा केला आहे. यंदा लोकसभेत आपापल्या विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या यशात आपलाच कसा सिंहाचा वाटा आहे व आपणच तिकीट मिळण्यास कसे लायक आहोत हे नेत्यांना पटवून देण्याकरिता वरिष्ठांकडे घिरट्या घालण्यास काहींनी सुरुवात केली आहे. मोदी लाटेमुळे काहीजण कसेबसे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मात्र, असे असतांनाही त्यांना आतापासूनच आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत.यासाठी काही जण आशिष शेलार, काही थेट मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असलेल्या नेत्याला मध्यस्थी करायला भाग पाडून तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. ठाण्यात त्यांच्याच पक्षाचा विद्यमान आमदार असतांनाही त्याठिकाणीही काही इच्छुकांनी दावा केला आहे. एका इच्छुकाने आपल्याला तिकीट मिळावे यासाठी आपल्या पत्नींकरवी भाजपच्या एका नेत्याकडे विनंती केली असल्याची माहिती आहे.शिवसेनेने ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावर दावा केला असून तो मिळावा यासाठी वरिष्ठांकडून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. स्थानिकांकडूनही या मतदारसंघासाठी दबाव टाकला जात आहे. परंतु, प्रत्येक महापालिका क्षेत्रात एक आमदार असावा असे भाजपचे धोरण असल्याने ते हा मतदारसंघ शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा