शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Vidhan Sabha 2019: मेहतांच्या विरोधात सेनेने थोपटले दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:43 IST

उमेदवारीला विरोध; पक्षस्तरावर पत्रव्यवहार

मीरा रोड : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला विरोध करणाऱ्या तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संस्कारांबद्दल पात्रता नसताना बोलणारे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिल्यास शिवसैनिक त्यांचा प्रचार करणार नाहीत, असे पत्र पक्षाचे प्रवक्ते शैलेश पांडे यांनी थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धाडले आहे.आ. मेहतांमुळे भाजपची बदनामी होत असून, शहरातील लोक त्यांना त्रासले आहेत. वेळ पडल्यास त्यांच्याविरोधात शिवसैनिक आंदोलन करतील, असे पांडे म्हणाले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भार्इंदरच्या शिवसेना शाखेजवळील सेनेचा स्वागत मंडपदेखील आ. मेहता व स्थानिक नगरसेविकेने आयुक्तांना तक्र ारी करून काढायला लावला होता.मीरा-भार्इंदर महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपने दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकवजा कलादालनास सातत्याने विरोध चालवला आहे. गेल्या आठवड्यातही प्रशासनाने तिसऱ्यांदा निविदा मंजुरीसाठी देऊनदेखील स्थायी समितीमध्ये भाजपने प्रस्ताव घेतला नाही. त्यावरून शिवसेना नगरसेवकांसह पदाधिकाºयांनी स्थायी समिती सभागृह, महापौर दालन, आयुक्त दालन येथे तोडफोड केली होती. त्यानंतर भाजपच्या नगरसेवक आदींनी भार्इंदर पोलीस ठाण्यात पालिका सचिव वासुदेव शिरवळकर यांच्यासह तळ ठोकला होता. शिरवळकर यांच्या फिर्यादीनंतर सेनेच्या १७ नगरसेवकांसह प्रवक्ते पांडे व अन्य ८ ते १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, पालिकेत आलेल्या आ. मेहतांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवत मारहाण ही सेनेच्या रक्तात असल्याचा आरोप करत, उद्धव ठाकरे यांच्या संस्कारांवर टिप्पणी केली होती.गणेश विसर्जनाच्या दिवशी भाजप आमदार, नगरसेविकेने काढायला लावलेला शिवसेनेचा स्वागत मंडप, बाळासाहेब यांच्या स्मारकाला विरोध, उद्धव यांच्यावर संस्काराची केलेली टिप्पणी, पोलीस ठाण्यात दबाव टाकून दाखल केलेला गुन्हा यामुळे शिवसैनिक संतापले आहेत.एकूणच परिस्थिती पाहता शिवसैनिकांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. प्रवक्ते शैलेश पांडे यांनी तर विधानसभा निवडणुकीत मीरा-भार्इंदरमधून मेहता यांना उमेदवारी दिल्यास शिवसैनिक त्यांचा प्रचार करणार नाहीत, असा इशाराच दिला आहे. तसे पत्र त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह जे.पी. नड्डा तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी दैवत असून त्यांचा अपमान शिवसैनिक कधीही सहन करणार नाहीत, असा इशारा पांडे यांनी दिला आहे.बाळासाहेब ठाकरे स्मारकवजा कलादालनासाठी आ.नरेंद्र मेहता यांनी मुद्दाम टोलवाटोलवी चालवली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केवळ महाराष्ट्राचा नसून, संपूर्ण हिंदुस्थानचा आहे. शहरात शिवसेना-भाजपमध्ये युती असून केवळ एका मुजोर, मस्तवाल व्यक्तीमुळे ही जागा भाजपला गमवावी लागेल, असा इशाराही पांडे यांनी दिला आहे.नरेंद्र मेहता यांची त्यांच्या मतदारसंघावर पकड आहे. शासनदरबारी त्यांचे वजन आहे. शिवाय त्यांची थेट मुख्यमंत्र्यांशी जवळीकही आहे. त्यामुळे पांडे यांच्या पत्राची कितपत गांभीर्याने दखल घेतली जाईल, हा प्रश्नच आहे.भाजपला याचा काहीएक फरक पडणार नाही. या मतदारसंघात शिवसेनेचा जनाधार तरी काय? भाजपचे या मतदारसंघात सर्वात जास्त नगरसेवक आहेत. एक लाख सदस्य व १० हजार सक्रिय सदस्य आहेत. युतीचा निर्णय वरिष्ठ नेते घेतात आणि भाजपचा उमेदवार कोण असेल, याचा निर्णय आमचे सांसदीय मंडळ घेते.- हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष, भाजप

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना