शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: मनसेतील इच्छुकांना पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:21 IST

कल्याण ग्रामीण मतदारसंघात मेळावा : मनसेतील इच्छुकांची तयारी सुरू

कल्याण : कल्याण ग्रामीण व डोंबिवली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मनसेकडे तुल्यबळ उमेदवार आहेत. स्थानिक पातळीवर त्यांनी निवडणुकीची तयारीही केली आहे. मात्र, पक्षप्रमुखांच्या आदेशाची वाट कार्यकर्ते पाहत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले.दूर्वांकुर सभागृहात झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्या मेळाव्यास मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, कल्याण-डोंबिवलीतील विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे, मनोज घरत, नगरसेविका सरोज भोईर, पदाधिकारी राहुल कामत, हर्षद पाटील, प्रकाश माने, महिला आघाडीच्या मंदा पाटील, दीपिका पेडणेकर आदी उपस्थित होते.कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील इच्छुक आहेत. पाटील यांनी २०१४ मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. निवडणुकीचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ते कडवी झुंज देऊ शकतात, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून मंदार हळबे हे इच्छुक आहेत. हळबे यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेते व गटनेतेपद भूषविले आहे. या पदावर असताना त्यांनी महापालिकेतील विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. हळबे हे ब्राह्मण आहेत. डोंबिवलीत ब्राह्मणबहुल मतदार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे त्याचा मनसेला फायदा होऊ शकतो. डोंबिवली व कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघांत मराठी मतांचे प्राबल्य आहे. ही मराठी मते मनसेला मिळू शकतात, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.२००९ मध्ये मनसेला कल्याण पश्चिम व कल्याण ग्रामीण विधानसभेवर यश मिळाले होते. २०१०च्या निवडणुकीत मनसेचे २८ नगरसेवक महापालिका निवडणुकीत निवडून आले होते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच डोंबिवलीत मनसे कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. कल्याण-डोंबिवली परिसरातील मतदारसंघांतून मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, असा होरा तेव्हा त्यांनी स्पष्ट केला होता. मनसेच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी केली असली तरी ठाकरे यांच्याकडून अद्याप कोणतेही संकेत आलेले नाहीत. त्यामुळे मनसे कार्यकर्ते त्यांच्या आदेशाची वाटप पाहत आहेत. दरम्यान, कल्याण पश्चिमेतून माजी आमदार प्रकाश भोईर इच्छुक आहेत. मात्र, कल्याण पूर्व मतदारसंघातून उमेदवाराच्या नावाची चर्चा नाही. उल्हासनगर, अंबरनाथ मतदारसंघांतून मनसेकडून काही जण इच्छुक आहेत.नागरिकांचे प्रश्न घेऊन उतरणार रिंगणातमनसेच्या १० नगरसेवकांनी डोंबिवलीत १० उद्याने विकसित केली आहेत. तसेच मनसेने कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या प्रश्नांना घेऊन मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहे, याकडे मेळाव्यात लक्ष वेधण्यात आले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे