शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : ठाणे जिल्ह्यात 13 मतदारसंघाची मतदानात घसरगुंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 21:45 IST

राज्यातील सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेला मतदारसंघ म्हणून ठाणो जिल्ह्याकडे पाहिले जाते.

- नारायण जाधवठाणे : राज्यातील सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेला मतदारसंघ म्हणून ठाणो जिल्ह्याकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षापासून येथील एकंदरीत मतदानाच्या टक्केवारीत दिवसेंदिवस घट होतांना दिसत आहे. हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने मतदानाचे प्रमाण वाढावे म्हणून पथनाटय़, मॅरेथॉन स्पर्धासह चित्रकला, स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांद्वारे जनजागृती केली. मात्र, तरीही यंदाही जिल्ह्यातील 18 पैकी 13 मतदारसंघात मतदानाचे प्रमाण 2014 च्या तुलनेत अडीच टक्क्यांनी घटले आहे.अगदी अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाशी तुलना केली तरी विधानसभेकरिता मतदानात दीड टक्के घट झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 8.96 टक्क्यांची घसरगुंडी ऐरोली मतदारसंघात झाली आहे. गेल्या वेळच्या तुलनेत सर्वात कमी घट शहापूर मतदारसंघात 0.90 टक्के आहे. विशेष म्हणजे सर्वच मतदारसंघात गेल्या खेपेपेक्षा मतदारांची संख्या वाढूनही मतदानाच्या टक्केवारीत ही गंभीर घट झाली आहे. जिल्ह्यात मतदानात वाढ झालेल्या पाच मतदारसंघात सर्वात चांगली वाढ उल्हासनगरात 8.67 टक्के इतकी आहे.जिल्ह्यात बहुभाषिकतेसह उत्तुंग इमारतींचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणा:या ओवळा-माजीवडय़ातही गेल्या वेळच्या तुलनेत 7.34 टक्के तर भिवंडी ग्रामीण सारख्या निमशहरी पट्टय़ातही ती 6.64 टक्के इतकी झाली आहे. डोंबिवली, बेलापूर, मुरबाड, मीरा-भाईंदर सारख्या मतदारसंघातही तिने गेल्या वेळेपेक्षा चार टक्क्याहून अधिकची घसरगुंडी नोंदविली आहे.जिल्ह्यातील भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व,  अंबरनाथ, उल्हासनगर आणि कळवा मुंब्रा या पाच मतदारसंघातील मतदान तेवढे वाढले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात एक लाख पाच हजार 610 मतदारांची वाढ होऊन विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात 63 लाख 29 हजार मतदारांची नोंद झाली होती. यातून 60 ते 65 टक्के मतदानाची अपेक्षा जिल्हा प्रशासाने व्यक्त केली होती. मात्र, सलग तीन दिवस आलेली सुटी, मतदारांचे झालेल स्थलांतर ही प्रमुख कारण मतदानाच्या टक्केवारीत झालेल्या घसरणीमागे असल्याचे कारण प्रशासनाने दिले आहे. यात ऐरोलीत माथाडी कामगार, कल्याण-डोबिवलीत औद्योगिक तर भिवंडीत लूम कामगारांनी स्थलांतर केल्याने टक्का घसरल्याचा दावा जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर यांनी व्यक्त केला.

ठाणे जिल्हा -एकूण जागा -18घट 13 मतदारसंघवाढ 5 मतदारसंघ  मतदारसंघ                              2014         2019                              घट/वाढ134  भिवंडी ग्रामीण                 66.24         59.60                      6.64 टक्के घट135  शहापूर .                          65.70         64.80                     0.90 टक्के घट136 भिवंडी पश्चिम                   49.58         50.32                      0.74 टक्के वाढ137 भिवंडी पूर्व                       44.30         47.81                       3.51 टक्के वाढ138 कल्याण पश्चिम                 44.92         41.74                        3.18  टक्के घट139 मुरबाड                          63.17          58.36                         4.81 टक्के घट140 अंबरनाथ                       39.71        42.32                           2.61 टक्के वाढ141 उल्हासनगर                   38.22        46.89                          8.67 टक्के वाढ142 कल्याण पूर्व                  45.19        43.55                            1.64 टक्के घट143 डोंबिवली                       44.74      40.72                            4.02 टक्के घट144 कल्याण ग्रामीण             47.94        46.37                           1.57 टक्के घट145 मीरा-भाईंदर                52.66        48.38                           4.28 टक्के घट146 ओवळा-माजीवडा        50.31        42.97                           7.34 टक्के घट147 कोपरी-पाचपाखाडी     53.10        49.09                           4.0 टक्के घट148 ठाणे                            56.56      52.47                             4.09 टक्के  घट 149 मुंब्रा-कळवा               47.48       49.96                            2.48 टक्के वाढ150  ऐरोली                       51.47          42.51                          8.96 टक्के घट151 बेलापूर                      49.69              45.16                      4.53 टक्के घट

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thaneठाणे