शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या ७६ तरुणांची जम्बो कार्यकारणी जाहीर

By अजित मांडके | Updated: January 5, 2023 18:07 IST

शिवसेना, भाजप पाठोपाठ मनसेने देखील ठाण्यावर लक्ष केंद्रीत केलेले आहे.

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची नवीन जम्बो कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे. यात तरुण फळी उभी करण्यात आली असून प्रत्येकाच्या खांद्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेत आणि मतदानात तरुणांचा वाढता टक्का लक्षात घेत मनसेने देखील यावर अधिक भर दिल्याचे दिसत आहे.

शिवसेना, भाजप पाठोपाठ मनसेने देखील ठाण्यावर लक्ष केंद्रीत केलेले आहे. त्यामुळेच मागील काही महिन्यात मनसेने ठाण्यात पुन्हा आपली ताकद वाढविण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यातही शिवसेना दोन गटात विभागली गेल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी देखील मनसेने व्युव्हरचना आखली आहे. त्यानुसार ज्या ज्या भागात मनसे कमी होती, त्या त्या ठिकाणी मनसेने लक्ष घालून मनसेची नवी फळी निर्माण केली आहे.

दरम्यान आता मागील काही निवडणुकांचा विचार केल्यास प्रत्येक निवडणुकीत तरुण मतदारांचा ओढा हा मतदान करण्याकडे अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा मतदारांना आर्कषित करण्यासाठी प्रमुख पक्षांनी मोर्चे बांधणी केली आहे. आता त्यात मनसे कशी पाठी राहणार, त्यांनी देखील तरुण मतदारांना आपलेसे करण्यासाठी पक्षातच तरुणांची फळी उभी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या ठाण्यातील विविध पदाधिका:यांच्या नियुक्त्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रसाठी ठाणो शहर सचिव पदी दिपक शिंदे, उपशहर अध्यक्ष संकेत देवे, विभाग अध्यक्ष महेश घाडगे, विभाग सचिव अनिकेत शिंगोटे, उपविभाग अध्यक्ष निखील कान्हेरे आदींसह कोपरी पाचपाखाडी, वागळे प्रभाग समिती, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती, ठाणो शहर, माजिवडा - मानपाडा, उथळसर, वर्तकनगर आदींसह इतर प्रभागात विविध तरुण तरुणींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात उपविभाग अध्यक्ष - २४, उपविभाग सचिव - ३३, शहर सचिव - २ आदींसह इतर महत्वाच्या नियुक्त्या धरुन तब्बल ७६ जणांची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Maharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाMNSमनसेElectionनिवडणूकThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका