शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडमध्ये आचारसंहितेचा भंग?; हळदी कुंकू कार्यक्रमाआडून महिलांना भेटवस्तू वाटप

By धीरज परब | Updated: October 23, 2024 00:02 IST

सदर संकुलाचा हळदी कुंकू कार्यक्रम होता व त्यासाठी आम्हा स्थानिक माजी नगरसेवकांना रहिवाशांनी बोलावले होते असं स्पष्टीकरण देण्यात आले.

मीरारोड - मीरारोड मधील एका गृहसंकुलात माजी भाजपा आमदार नरेंद्र मेहता याना मतं द्या असं आवाहन माजी नगरसेवकांनी केले. त्यानंतर उपस्थित महिलांना भेट वस्तू देण्यात आल्याचा प्रकार व्हिडिओ व फोटो समोर आल्याने विरोधकांकडून कारवाईची मागणी होत आहे . विधानसभा निवडणुकीत सध्या कोणत्यातरी कार्यक्रमाच्या आड भेटवस्तू देणे वा भेट वस्तूसाठी टोकन देऊन ती भेट परिसरातील कार्यकर्त्या मार्फत पोहचवणे आदी प्रकार सुरू आहेत.  

त्यातच मंगळवार २२ ऑक्टोबर रोजी मीरारोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्स मध्ये नवग्रह संकुलाच्या आवारात महिलांचा कार्यक्रम होता . यावेळी मेहता यांचे समर्थक भाजपाचे माजी नगरसेवक अनिल विराणी , मनोज दुबे , सीमा शाह , रेखा विराणी आदींसह भाजपा कार्यकर्त्या या कार्यक्रमास आले होते . यावेळी कार्यक्रमात माजी नगरसेवकांनी नरेंद्र मेहता यांना मतदान करण्याचे आवाहन केले . त्या नंतर जमलेल्या महिलांना विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तूंची भेट देण्यात आली . सदर कार्यक्रमाचे व्हिडीओ आणि छायाचित्रे व्हायरल झाले आहेत . या प्रकरणी माजी भाजपा नगरसेवक अनिल विराणी यांनी सांगितले कि , सदर संकुलाचा हळदी कुंकू कार्यक्रम होता व त्यासाठी आम्हा स्थानिक माजी नगरसेवकांना रहिवाशांनी बोलावले होते . भेटवस्तू आम्ही दिल्या नसून त्या रहिवाशांनी आणलेल्या होत्या व त्यांनी वाटल्या असं स्पष्टीकरण दिले.  

सत्यकाम प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड . कृष्णा गुप्ता म्हणाले की , निवडणूक काळात शहरात उघडपणे राजकारणी हे मतदारांना भेटवस्तू वाटत आहेत .  भ्रष्ट आणि कर्तव्यच्युकार अधिकारी - कर्मचारी यांच्या आशीर्वादाने आचार संहिता भंग करणे राजकारण्यांच्या हातचा मळ बनला आहे . ह्यातून भ्रष्टाचाराचा व काळा पैसा मुबलक वापरला जात असल्याने गुन्हे दाखल करून बेजबाबदार अधिकारी - कर्मचारी यांना पण निलंबित करावे अशी मागणी त्यांनी केली.  

दरम्यान, मोठ्या मोठ्या गृहसंकुलातील आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेले मतदार देखील निवडणुकीत राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून भेट वस्तू घेणे , इमारतीचे कामे करून घेणे , सहल वा जेवणावळी झोडणे आदी प्रकार करणे लोकशाहीला मारक असून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारे आहे . अशा प्रकारांना आळा घालून सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे  अशी मागणी माजी नगरसेवक रोहित सुवर्णांनी केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mira-bhayandar-acमीरा-भाईंदरBJPभाजपा