शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर विधानसभेची भाजपाची उमेदवारी नरेंद्र मेहतांना; शेवटच्या दिवशी सुटला तिढा

By धीरज परब | Updated: October 29, 2024 19:30 IST

मीरा भाईंदर मतदार संघ भाजपाच्या वाट्याला, शेवटच्या क्षणी गेला तशीच भाजपाची उमेदवारी देखील २९ ऑक्टोबर रोजी नरेंद्र मेहता यांना दिली गेली

मीरारोड - मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघाचा महायुती आणि नंतर भाजपात जागा वाटप , उमेदवारी वरून चाललेला अटीतटीचा तिढा अखेर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुटला आहे . भाजपाकडून मंगळवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या यादीत माजी आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे . त्यामुळे मेहता समर्थकांनी जल्लोष केला आहे . 

मीरा भाईंदरच्या माजी महापौर राहिलेल्या गीता जैन यांनी २०१९ मध्ये तत्कालीन भाजपाचे उमेदवार आ . मेहतांचा पराभव केला होता व आमदार म्हणून निवडून आल्या होत्या . त्यावेळी देखील जैन यांनी भाजपा कडून उमेदवारी मागितली होती . परंतु मेहता हे भाजपा नेते देंवेंद्र फडणवीस आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचे मर्जीतले मानले जात असल्याने त्यावेळी देखील मेहतांच्या विरोधात शहरातील वातावरण असताना मेहतांना उमेदवारी दिली गेली होती . 

आमदार झाल्यावर जैन ह्या फडणवीस यांची भेट घेऊन भाजपा सोबत गेल्या . मात्र सरकार बदलल्याने शिवसेनेला पाठिंबा दिला . ठाकरे सरकार पडणार असते वेळी जैन ह्यांना परत भाजपाने जवळ केले . तर भाजपा नेत्याच्या सुचणे नुसार त्या एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी होत गुवाहाटीला गेल्या . शिंदे - फडणवीस ह्या दोघांनी जैन यांना उमेदवारी देण्याचे आश्वस्त केले होते . दुसरीकडे शिंदे सेनेने मीरा भाईंदर वर दावा केला . 

मीरा भाईंदर मतदार संघ भाजपाच्या वाट्याला शेवटच्या क्षणी गेला तशीच भाजपाची उमेदवारी देखील शेवटच्या क्षणी २९ ऑक्टोबर रोजी नरेंद्र मेहता यांना दिली गेली . ह्या वरून सदर मतदार संघात महायुतीत रस्सीखेच होती तेवढीच भाजपात उमेदवारी मिळवण्या वरून होती असे स्पष्ट होते . मेहता यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे . उमेदवारी मिळण्या आधी मेहतांनी आपले विविध प्रकारे शक्ती प्रदर्शन चालवले होते . तर मेहतांनी स्वतः सह त्यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज भाजपा आणि अपक्ष म्हणून सोमवारीच भरला होता . पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची देखील त्यांची तयारी असल्याची चर्चा होती . 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mira-bhayandar-acमीरा-भाईंदरBJPभाजपाthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024