शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

Maharashtra Election 2019: ईव्हीएमबद्दल शंकेमुळे मतदान कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 05:40 IST

Maharashtra Election 2019: मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे माहीत असूनही शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा कमी मतदान होते हे सत्य आहे.

- प्रा. सुनीता कुलकर्णी

मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे माहीत असूनही शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा कमी मतदान होते हे सत्य आहे. अनेक सुशिक्षित माणसे या काळात सहलीला जातात. वास्तविक, टी.व्ही व अन्य प्रसारमाध्यमांतून मतदानाचे महत्त्व व आवाहन वरचेवर केले जाते. तरीही मतदानाची टक्केवारी वाढत नाही. मतदारांच्या मनात इतकी उदासीनता का आहे? याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.या उदासीनतेची काही कारणे अशी आहेत.

१) उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी२) घराणेशाही३) राजकीय पक्षांनी दिलेली खोटी आश्वासने.

एकूणच राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. सेवेपेक्षा व्यवसाय असे स्वरूप प्राप्त झाले आहे. पैशांचा वाढता वापर हा गुंतवणूक व त्यातून परतावा या तत्त्वानुसार केला जात आहे. कोणीही निवडून आले तरी स्थितीत फरक पडत नाही, हा अनुभव असल्याने ही उदासीनता आणखीन वाढली आहे.

त्यातच ईव्हीएमबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे, त्यामुळेही लोक मतदानाला उत्साहाने जात नाहीत. ही स्थिती बदलावी, याकरिता ठाणे मतदाता जागरण अभियान सतत प्रयत्नशील असते. नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, योग्य त्या सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. याकरिता प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना उत्तरदायी करण्याचा आग्रह नागरिकांना बरोबर घेऊन आम्ही धरत असतो.

अभियानाने महापालिका निवडणुकीत सुशिक्षित उमेदवार देऊन एक प्रयत्न केला. त्यांचा सर्व प्रचार कमीतकमी पैशांत होऊ शकतो, हे प्रत्यक्ष करून दाखवले. मतदारांची वृत्ती बिघडवण्याचे काम सत्ताधारी व विरोधी पक्ष करीत असतात, आमिष दाखवून मते घेणे हे होत असले तरी अंतिमत: ते नागरिकांच्या हिताविरोधी असते हे आता कळायला लागले आहे. चिरागनगरमध्ये महिलांनी उमेदवारांना फक्त १० मिनिटे पाणीपुरवठा का करण्यात येतो, यावरून सतत प्रश्न विचारले. तसेच तरुणांनी आरेमधील वृक्षतोडविरोधी आवाज उठवला.

जेलमध्ये गेले, ही उदाहरणे बदल घडत आहेत, याची आहेत. याबाबत केवळ निवडणुकीच्या वेळी नाही तर सतत पुढील काळातही जनजागृती करणे ही अभियानाची भूमिका आहे. आपल्या मत देण्याने फरक पडू शकतो, याची जाणीव महत्त्वाची आहे. नागरिकांना गृहीत धरण्याची वृत्ती राजकारण्यांनी सोडायला हवी. संघटित मतदार हे करू शकतात, या दिशेनेच ठाणे मतदाता जागरण अभियानाचे काम सुरू आहे. प्रत्येकाने आपली सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून मतदान करावे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानEVM Machineएव्हीएम मशीन