शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019:उल्हासनगरमध्ये चुरशीची लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 01:31 IST

Maharashtra Election 2019: शहरातील समस्यांना बगल

उल्हासनगर : मतदारसंघातील समस्यांना बगल देत, शहर विकासाच्या मुद्याला मात्र दोन्ही प्रमुख उमेदवारांनी प्रचारादरम्यान हात घातला. पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, अर्धवट विकासकामे, अर्धवट कल्याण-बदलापूर रस्ता, धोकादायक इमारतींचा प्रश्न, वाहतूककोंडी आदी गंभीर समस्या निवडणूक प्रचारात कुठेही दिसल्या नाही. भाजपचे आयलानी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांसह पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीही हजेरी लावली. राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांच्या प्रचारासाठी मात्र एकही नेता फिरकला नाही. दोन्ही नेत्यांनी विकासकामांच्या आश्वासनांचा मतदारांवर अक्षरश: पाऊस पाडला आहे.

उल्हासनगर मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात असून, भाजपचे कुमार आयलानी आणि राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांच्यात थेट लढत आहे. रिपाइंचे बंडखोर उमेदवार भगवान भालेराव यांनी अखेरच्या टप्प्यातील प्रचारात नॉनसिंधी मतदारांना आकर्षित करण्याचे काम सुरू केले. पक्षश्रेष्ठी तसेच मुख्यमंत्र्यांनी कलानी कुटुंबाला शब्द देऊनही कुमार आयलानी यांना उमेदवारी दिल्याने, नाराज झालेल्या कलानी कुटुंबाने विद्यमान आमदार ज्योती कलानी यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरवले.

कलानी यांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांचा मुलगा व ओमी टीमचा प्रमुख ओमी कलानी यांनी घेतली आहे. आयलानींच्या निवडणुकीची सूत्रे मुलगा धीरज आयलानी, गटनेते जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक प्रकाश माखिजा, मनोज लासी, प्रदीप रामचंदानी आदींच्या हातात आहे. रिपाइंच्या बंडखोर उमेदवाराच्या मतांचा परिणाम दोघांवर होण्याची शक्यता आहे.

कुमार आयलानी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावून उल्हासनगरात मेट्रो आणण्याचे आश्वासन दिले. सिंधी समाजाला आकर्षित करण्यासाठी मेट्रो स्टेशनचे नाव सिंधुनगर ठेवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. उत्तर भारतीय मतदारांना भाजपकडे खेचण्यासाठी भोजपुरी अभिनेता व खासदार मनोज तिवारी यांचा रंगारंग कार्यक्रम घेतला. त्यापाठोपाठ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची रॅली काढण्यात आली.

दुसरीकडे कलानी कुटुंब स्वत:च्या ताकदीवर घरोघरी जाऊन प्रचार करीत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा एकही मोठा नेता प्रचार करण्यासाठी फिरकला नाही. कलानी कुटुंबाचे शहरातील वर्चस्व वेळोवेळी सिद्ध झाले असून, मोदीलाटेतही ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या चिन्हावर आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

रिपाइंचे बंडखोर उमेदवार भगवान भालेराव यांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला. कुमार आयलानी यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सकाळी ६ वाजता सेंच्युरी कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ उभे राहून मतदान करण्याची विनंती कामगारांना केली. वरिष्ठ नागरिक संघ, योगा केंद्र, मैदान व उद्यानात सकाळी जाऊन मतदानाचे आवाहन आयलानी यांनी नागरिकांना केले.ज्योती कलानी यांनीही प्रचारासाठी तेच तंत्र वापरले आहे. आयलानी व कलानी यांनी शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न, अवैध बांधकामे नियमित करणे, कल्याण ते बदलापूर रस्त्याची पुनर्बांधणी, शहर विकास आराखडा, शहर विकासासाठी शासनाकडून विशेष निधी, शहरातील जागा महापालिकेला हस्तांतरित करणे आदी विकासकामांचे आश्वासन दिले.विकास ठप्प झाल्याने

नागरिकांचे स्थलांतर

शहराचा विकास ठप्प पडल्याने, हजारो नागरिक इतर शहरांत स्थलांतरित होत आहेत. परिणामी, बहुसंख्येने असलेल्या सिंधी समाजाची लोकसंख्या मराठी भाषिकांपेक्षा कमी झाली. शहारतील राजकीय मक्तेदारीमुळे शहरावर ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप रिपाइंचे बंडखोर उमेदवार भगवान भालेराव यांनी केला.

टॅग्स :ulhasnagar-acउल्हासनगरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019