शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: ठाणे शहराच्या मतदानात घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:24 IST

Maharashtra Election 2019: कोणाला बसणार फटका, राजकीय वर्तुळात विश्लेषण

ठाणे : ठाणे शहर मतदारसंघातील पाच उमेदवारांचा फैसला सोमवारी मतपेटीत बंद झाला. मागील वेळेच्या तुलनेत यंदा ४.०९ टक्क्यांनी मतदानात घट झाली आहे. याची आता वेगवेगळी कारणे पुढे येत असली पर्याय असतानाही शिवसेनेच्या या बालेकिल्यात मतदानाच्या टक्केवारीत घट का झाली याची चर्चा मात्र सुरु झाली आहे. या ठिकाणच्या समस्या सुटलेल्या नाहीत, की विद्यमान आमदाराकडून मतदारांची निराशा झाली, आदींसह इतरही कारणे आता चर्चेला आली आहेत. परंतु, या घटलेल्या टक्केवारीचा नेमका फायदा कोणाला होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ठाणे शहर मतदारसंघात ५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. परंतु, खरी लढत ही भाजप विरुद्ध मनसे अशीच झाली आहे. मागील वेळेस युती व आघाडी न झाल्याने भाजप विरुद्ध शिवसेना तर काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी चौरंगी लढत या मतदारसंघात होती. परंतु, आताच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाल्याने भाजप येथून लढली. मात्र, आघाडीकडून राष्ट्रवादीने अंतिम क्षणी माघार घेऊन मनसेला पाठिंबा दिला. यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी या मतदारसंघाची निवडणूक ही शेवटच्या क्षणी चुरशीची झाल्याचे चित्र पाहावायस मिळाले.

मनसेला राष्ट्रवादीने थेट टाळी दिली, तर काँग्रेसने अखेरच्या क्षणी छुपा पाठिंबा दिला. त्यामुळे खऱ्या अर्थाने या निवडणुकीची समीकरणे काहीशी बदलतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीतही वाढ होईल, असेही बोलले जात होते. मात्र, प्रत्यक्षात मतदानाची टक्केवारी घटल्याचे दिसून आले. त्यामुळे आता कोणत्या बुथमधून टक्केवारीत घट झाली, याचा उहापोह शिवसेना आणि भाजपच्या गोटातून सुरू झाला आहे. त्यामुळे बुथनिहाय आकडेवारी गोळा करण्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेताना दिसले. येथे खरी लढत ही भाजपचे संजय केळकर विरुद्ध मनसेचे अविनाश जाधव यांच्यात आहे.

२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत येथे ५६.५६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २०१४ मध्ये एकूण ३ लाख २२ हजार १६८ मतदारांपैकी १ लाख ८२ हजार २३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ८२ हजार ८०६ पुरुष आणि ९९ हजार ४२७ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

विशेष म्हणजे पुरुष मतदात्यांच्या तुलनेत १६ हजार ६२१ अधिक महिलांनी मतदान केले आहे. यंदा या मतदारांची संख्या ३ लाख ३७ हजार ९०९ एवढी होती. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्यादेखील वाढली असतानाही मतदानाची टक्केवारी घटल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, या निवडणुकीत यंदा ५२.४७ टक्के मतदान झाले असून मागील निवडणुकीच्या तुलनेत ४.०९ टक्के मतदानात घट झाली आहे. यावेळी एकूण मतदारांपैकी ९७ हजार ७०० पुरुष तर ७९ हजार ५०० महिलांनी अशा एकूण १ लाख ७७ हजार २२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

एकूणच मागील निवडणुकीपेक्षा कमी झालेल्या टक्केवारीची अनेक कारणे आता पुढे आली आहेत. एकतर हा मतदारसंघ सुशिक्षित, संस्कृत मतदारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. असे असतानाही या मतदारसंघात कमी मतदान झाले. याचाच अर्थ या ठिकाणी विद्यमान आमदार मतदारांच्या पंसतीस न उतरल्याने किंवा त्याच्याकडून कामे झाली नसल्याने किंवा या मतदारसंघातील वाहतूककोंडी, जुन्या इमारतींचा प्रश्न, अरुंद रस्ते, रस्त्यावरील खड्डे आदींच्या समस्या सुटलेल्या नसाव्यात म्हणूनच कदाचित मतदार राजा कमी प्रमाणात उतरल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे सक्षम पर्याय म्हणूनही अविनाश जाधव यांना कदाचित पसंती नसल्याचे कारण पुढे आले असून विद्यमान आणि पर्याय हे दोघेही अयोग्य वाटत असल्याने कदाचित मतदानाची टक्केवारी घटली असावी असाही आता कयास लावला जात आहे.

राष्ट्रवादीच्या मतदारांनी पाठ फिरवल्याचा अंदाज

राष्ट्रवादीने मनसेला टाळी दिली असली तरी राष्ट्रवादीला मानणारा मतदार मतदानासाठी कमी संख्येने उतरला असावा अशी चर्चा आहे. काँग्रेस एक वेळेस राष्ट्रवादीला मतदान करू शकते. मात्र ऐन वेळेस श्रेष्ठींनी मनसेला आतून टाळी दिली आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना इंजिनाला मतदान करा, अशा सुचना दिल्या.

या निवडणुकीत पंजाच नसल्याने इंजिनाला मतदान कसे करायचे असा पेच अनेक सर्वसामान्य मतदारांना सतावत होता. त्यामुळेच याचाही फटका बसून टक्केवारी घसरली असावी, असेही बोलले जात आहे. घटलेल्या टक्केवारीचा फायदा कोणाला होणार, केळकर सेंकड पार्ट लिहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thane-acठाणे शहर