शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 : वांद्रे-वरळी सी लिंकचा 'वनवास', 14 वर्षांचा लांबलचक काळ - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 21:36 IST

भगवान राम सीतामातेला अयोध्येला आणण्याइतकी 14 वर्षं वांद्रे-वरळी सी लिंकला लागली, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

डोंबिवलीः भगवान राम सीतामातेला अयोध्येला आणण्याइतकी 14 वर्षं वांद्रे-वरळी सी लिंकला लागली, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. काय कराल प्रगतीचं, काय कराल विकासाचं, जग कुठे गेलंय आणि अजूनही आपण कुठल्या गोष्टींवरून निवडणुका लढवतोय आणि निवडणुकीत सांगतोय चांगले रस्ते देऊ, खरंच तुमच्या आणि आमच्या मूलभूत गरजा काय असतात, 8 ते 10 गोष्टींपेक्षा जास्ती गरजा नसतात, चांगले रस्ते हवेत, चांगला वीजपुरवठा हवा, उत्तम कॉलेज, दवाखाना असावा, असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधारी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. ते डोंबिवलीतल्या सभेत बोलत होते. कल्याण-डोंबिवली शहराला 6500 कोटी रुपये देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला आहे. सुशिक्षित डोंबिवलीची बकाल शहर ओळख झाली. मराठी उद्योजक महाराष्ट्र सोडून परदेशात जात आहेत. सत्ताधाऱ्यांना मराठी कलाकारांचा विसर पडला आहे. शेतकरी आत्महत्येसाठी जिल्ह्याची ओळख असणं लाजिरवाणी बाब आहे. सुविधांचा अभाव असून, शहराचा विकास वाऱ्यावर सोडण्यात आला आहे. फडणवीसांनी दीड लाख विहिरी कुठे बांधल्या?, असं म्हणत त्यांनी फडणवीसांवरही हल्लाबोल केला आहे.आरएसएसला मानणारा मोठा वर्ग डोंबिवलीत आहे, सत्ताधाऱ्यांनी शहरं घाण करून टाकली आहेत, मेक इन महाराष्ट्राचा भाजपाकडून बोजवारा उडाला आहे, पीएमसी बँकेचा भ्रष्ट व्यवहार आहे. या सगळ्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्राला खंबीर विरोधी पक्षाची गरज आहे. सरकारच्या अकार्यक्षमतेवर तुम्ही गप्प का?, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019