शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : ठाण्यात अपहरणकर्ते उमेदवार; जिल्ह्यात ८१ उमेदवारांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 04:59 IST

विशेष म्हणजे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांपैकी भिवंडी ग्रामीण मतदारसंघातील सर्व उमेदवारांविरु द्ध एकही गुन्हा दाखल नसल्याचेही त्यामध्ये दिसत आहे. तर, १३२ उमेदवारांवर एकही गुन्हा दाखल नाही.

ठाणे : जिल्ह्यातील १८ मतदारसंघांत २१३ उमेदवार आपले नशीब आजमावत असून यामधील ८१ उमेदवारांवर विविध गुन्हे दाखल आहेत. यात अपहरणाचा गुन्हा असणारे दोन, खुनाचा प्रयत्न करणारा एक आणि हत्यार बागळणे, यासारख्या गंभीर गुन्ह्यांसह राजकीय गुन्हे असणाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांपैकी भिवंडी ग्रामीण मतदारसंघातील सर्व उमेदवारांविरु द्ध एकही गुन्हा दाखल नसल्याचेही त्यामध्ये दिसत आहे. तर, १३२ उमेदवारांवर एकही गुन्हा दाखल नाही.जिल्ह्यात एकूण ३७२ उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले होते. त्यातील छाननीअंती २५१ अर्ज वैध ठरले, तर ३८ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे १८ मतदारसंघांत २१३ उमेदवार रिंगणात आपले नशीब आजमावत असून त्यामध्ये २१ आजी-माजी आमदार आणि २४ महिला उमेदवारांचा समावेश आहे.महायुती, आघाडी आणि मनसे, वंचित बहुजन आघाडी आदी पक्षांसह ८२ अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या सर्व उमेदवारांनी आपल्या प्रतिज्ञपत्रात व्यवसायापासून शिक्षण, संपत्ती आणि पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांचाही तपशील जोडला आहे.यामध्ये बहुतांश राजकीय गुन्हे दाखल असल्याचे म्हटले आहे. तर, इतरही उमेदवारांविरु द्ध फसवणूक, बेकायदा जमाव करणे, विनापरवाना हत्यार बाळगणे, सरकारी कामात अडथळा आणणे आदी गुन्हे दाखल आहेत. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. तसेच डोंबिवलीतील भाजपचे उमेदवार तथा विद्यमान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि मुरबाड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांच्याविरु द्ध अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातच नमूद आहे.राजकीय गुन्ह्यांचा समावेशराजकीय स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. तर, काही उमेदवारांवरील गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत. सर्वाधिक कल्याण पश्चिममध्ये ९, त्यापाठोपाठ उल्हासनगर ७, भिवंडी व कल्याण पूर्व सहा, कल्याण ग्रामीण, ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी, बेलापूर आणि ऐरोली या मतदारसंघांत पाच, मुरबाड, अंबरनाथ, मीरा-भार्इंदर येथे चार, शहापूर, भिवंडी पश्चिम तीन, डोंबिवली मतदारसंघात गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या दोन आहे.एकही गुन्हा दाखल नसलेला मतदारसंघभिवंडी ग्रामीण मतदारसंघात राजकीय पक्षांसह अपक्ष असे सात उमेदवार आहेत. त्या सातही उमेदवारांवर एकही गुन्हा दाखल नाही.उमेदवारांना द्यावयाची आहे जाहिरातीद्वारे गुन्ह्यांची माहितीनिवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मतदारांना द्यावयाची आहे. यासाठी त्यांनी आता तीन दिवस वृत्तपत्र आणि दृक्श्राव्य माध्यमातून जाहिरात द्यावी लागणार आहे.

टॅग्स :thaneठाणेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019