शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात-राजस्थानातून येणारे बोगस मतदार, काळ्या पैश्यांना रोखण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी 

By धीरज परब | Updated: November 18, 2024 22:18 IST

यंदाच्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील महानगरात खूप मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क,  मीरारोड - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुजरात - राजस्थान मधून बोगस मतदार व काळा पैसा आणला जात  असल्याने याप्रकरणी निवडणुका आयोगासह पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे. 

यंदाच्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील महानगरात खूप मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. १४५ मीरा.भाईंदर या मतदार संघात, नजीकच्या काही महिन्यातच ६८ हजार पेक्षा अधीक मतदारांची नवीन नावे नोंदणी झाली आहे. याचे आकलन केले असता, ६०% नावे बोगस असल्याचे समजते. ही बहुतेक नावे धारण करणारी मंडळी, गुजरात, राजस्थान राज्यातून निवडणूकीच्या दिवशी येणार असून, दि. १९ ते २०  रोजी महाराष्ट्र राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार आपल्या राज्यात शेजारच्या राज्यातून प्रवेश कराणार असल्याचे माहीती खात्रीलायक सूत्रांकडून समजली आहे असे एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख, प्रदिप सामंत यांनी तक्रारीत स्पष्ट म्हटले आहे.

या दिवशी बोगस मतदान होण्यासाठी, मतदारांना प्रलोभने दाखवण्यासाठी, मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शक ठेवण्यासाठी, वरील दोन दिवसंच्या कालावधीत, गुजरात, राजस्थान राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणा-या खाजगी (बस) प्रवासी वाहनांवर बंदी घालण्यात यावी. छोट्या चार चाकी वाहनांची व त्यामधील प्रवाशांची कसून चौकशी करावी. त्यांचा राज्यात प्रवेश करण्याचा हेतू तपासून घ्यावा.

पश्चिम दृतगती महामार्ग (चारोटी चेकनाका) व डांग प्रांतातून नाशिकच्या दिशेने येणा-या महामार्गावर विशेष तपासणी चौक्या उभारणे अतिशय आवश्यक आहे. सुरत वरुन डहाणू मार्गे रेल्वेगाड्यातून येणा-या प्रवाशांना रोखणे व तपासणी आवश्यक आहे.

कोविड टाळेबंदीच्या काळात जंतू संसर्ग होऊ नये, म्हणून अशी नाकेबंदी करण्यात आली होती, राज्याच्या सिमा सिलबंद करण्यात आल्या होत्या. त्या अनुभवावरुन, निवडणूक आयोगाला वरीलप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे सहज शक्य आहे.

 राज्यातील निवडणूक प्रक्रिया बोगस मतदानाने व आर्थिक प्रलोभनाने प्रभावित होऊ नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी केली  आहे. मीरा भाईंदर च्या २०१४ सालच्या विधानसभा निडणुक वेळी राई खाडी येथे गुजरातच्या नागरिकांची असंख्य बनावट पॅनकार्ड, यादी आदि सापडले होते याची आठवण सामंत यांनी करून दिली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mira Bhayanderमीरा-भाईंदरthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024mira-bhayandar-acमीरा-भाईंदर