शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ठाण्यात रंगणार ३ डिसेंबरला महामॅरेथॉन कर दे धमाल, धावपटूंचा प्रतिसाद; लवकरात लवकर सहभागी व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 12:03 IST

Mahamarathon:

ठाणे - महामुंबई येथील धावपटू आणि नागरिक नेहमीच लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आतुर असतात. आता यंदा लोकमत महामुंबई महामॅरेथॉनचा थरार ३ डिसेंबर रोजी ठाणे येथील रेमण्ड कंपनीच्या कंपाऊंडमध्ये रंगणार आहे. असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन अॅण्ड डिस्टन्स रेसतर्फे (एम्स) पात्रता दर्जा प्राप्त असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही महत्त्व प्राप्त झालेली ही महामॅरेथॉन नागरिक व धावपटूंसाठी एक मोठी पर्वणी आहे. त्यामुळे सहभागी धावपटूंसाठी पुन्हा एकदा 'कर दे धमाल करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात 'लोकमत'ने यशाची अनेक शिखरे याआधीच पादाक्रांत केली आहेत. समाजात आरोग्य, तंदुरुस्तीविषयी जागरुकता निर्माण व्हावी या उदात्त हेतूने लोकमत समूहातर्फे महामॅरेथॉनचे आयोजन केले जाते. यंदा महामॅरेथॉनचे हे सातवे पर्व आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गतवर्षीप्रमाणे यंदाही सहा ठिकाणी लोकमत महामॅरेथॉनमध्ये धावण्याची संधी धावपटूंना मिळत आहे. यंदा लोकमत महामॅरेथॉनचा श्रीगणेशा ३ डिसेंबर रोजी आपल्या महामुंबई मॅरेथॉनने होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे १७ डिसेंबर, नाशिक येथे ७ जानेवारी, कोल्हापूरला २८ जानेवारी, नागपूरला ४ फेब्रुवारी आणि पुणे येथे १८ फेब्रुवारी रोजी महामॅरेथॉन रंगणार आहे. 

१२ लाखांपर्यंत रोख पारितोषिकेमॅरेथॉनमध्ये २१ आणि १० कि. मी. मध्ये सहभागी झाल्यानंतर १२ लाखांपर्यंत असणार पारितोषिके, तसेच ३ आणि ५ कि.मी. मधील स्पर्धकांना मिळणार मेडल आणि प्रमाणपत्रे. यंदा होणारी महामॅरेथॉन ३ कि. मी., ५ कि. मी., १०कि. मी. आणि २१ कि. मी. अंतरात होणार आहे. 

३ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनसाठी धावपटू, नागरिक वर्षभरापासून शहरातील विविध मैदानांवर कसून सराव करीत आहेत. जगभरात प्रसिद्ध असणारे टोकियो, लंडन, न्यूयॉर्क मॅरेथॉनला साजेल अशा अद्ययावत  तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग झालेली ही अत्युच्च दर्जाची लोकमत समूहाची महामॅरेथॉन असल्याची प्रतिक्रिया  सहभागी धावपटूंत नेहमीच असते.

ग्रुप रजिस्ट्रेशनही करता येणार 3 डिसेंबर रोजी महामुंबई येथे होणाऱ्या लोकमत समूहाच्या महामॅरेथॉनमध्ये ५० च्या संख्येने ग्रुपने रजिस्ट्रेशन करता येणार आहे. ग्रुपने रजिस्ट्रेशन करू इच्छिणाऱ्यांनी ९५९४२२२०२४ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.

विजेत्यांना रोख पारितोषिकांसोबत प्रायोजकांकडून आकर्षक बक्षिसे देखील मिळणार आहेत, तसेच सर्व धावपटूंमधून काही भाग्यवान विजेत्यांनादेखील आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक धावपटू, नागरिकांना क्यूआर कोड स्कॅन करून आपला ऑनलाइन सहभाग निश्चित करता येणार आहे.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनMumbaiमुंबईthaneठाणेLokmatलोकमत