शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मधुमिता नारायणने पटकावले सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:38 IST

ठाणे महापौर चषक राज्य सबज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धा : पालकमंत्र्यांकडून सन्मान

ठळक मुद्देमधुमिताने उपांत्यपूर्व फेरीत नागपूरच्या आसावरी खांडेकरचा २१-६ , २१-९ असा सहज पराभव केला

ठाणे : ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा व शहर बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २५ आॅगस्ट या कालावधीत आयोजित केलेल्या राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत ठामपाच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अ‍ॅकॅडमीच्या तेरावर्षीय मधुमिता नारायण हिने अजिंक्यपद पटकावले. आपल्या घरच्या मैदानावर कारकिर्दीतले पहिले सुवर्णपदक पटकावणाऱ्या मधुमिताला राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्र म,) सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले.

मधुमिताने उपांत्यपूर्व फेरीत नागपूरच्या आसावरी खांडेकरचा २१-६ , २१-९ असा सहज पराभव केला. उपांत्य फेरीत अनन्या गाडगीळचे कठीण आव्हान मधुमिताने आपल्या आक्र मक फटक्यांनी व नेटजवळच्या सुंदर खेळाने २१-१५, २१-१९ अशी मात करत सहज विजय मिळवला. दुहेरीची पार्टनर व प्रतिस्पर्धी अलिशा नाईकबरोबर मधुमिताने अंतिम सामना खेळला. प्रथम गेमच्या सुरुवातीपासून काहीशी अडखळत खेळत मधुमिताने पहिला गेम १३-२१ असा खेळला. परंतु, दुसºया गेममध्ये मोठ्या रॅली खेळवत गेमवर २१-१२ अशी पकड मिळवली. निर्णायक ठरलेल्या तिसºया गेममध्ये सुरुवातीपासूनच प्रभुत्व मिळवत २१-७ असा सुवर्णविजय मधुमिताने सहज मिळवला.दुहेरीत निकिता जोसेफ-आसावरी खांडेकर या नागपूरच्या जोडीविरु द्ध मात्र मधुमिता- अलिशा नाईक यांना २१-१३, २०-२२, १३-२१ या डावाने खेळून रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.स्पर्धेचे यशस्वी संयोजन केल्याबद्दल व दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य अजिंक्यपदाची परंपरा अकादमीने कायम राखल्याबद्दल ठाणे अ‍ॅकॅडमीचे प्रमुख श्रीकांत वाड, वरिष्ठ प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर यांनी समाधान व्यक्त केले. तर, पालकमंत्र्यांनी पारितोषिक वितरण समारंभास मधुमिताच्या या यशाबद्दल रोख २५ हजार रुपयांचे विशेष बक्षीस जाहीर केले आहे. याप्रसंगी नगरसेविका पल्लवी कदम, माजी नगरसेवक पवन कदम, क्र ीडा अधिकारी मीनल पालांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे