शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

प्रभू श्रीराम हे खाजगी मालमत्ता नाही ; उद्धव ठाकरे यांची भाजपावर टीका

By धीरज परब | Updated: December 25, 2023 13:29 IST

मध्यप्रदेशच्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री यांनी आम्हाला मत द्याल तर श्रीरामाचे मोफत दर्शन घडवू असे म्हणाले .

मीरारोड - मध्यप्रदेशच्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री यांनी आम्हाला मत द्याल तर श्रीरामाचे मोफत दर्शन घडवू असे म्हणाले . मग काय महाराष्ट्रातल्या हिंदूंना मोफत दर्शन मिळणार नाही का ? श्रीरामाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना कोणाला मत दिले हे विचारून दर्शन देणार का ? प्रभू श्रीराम हे तुमची खाजगी मालमत्ता नाही अशी टीकेची झोड माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मीरारोड येथील गोवर्धन पूजा सोहळ्यात केली . यावेळी भाजपा महाराष्ट्रातून उद्योगधंदे बाहेर नेत असल्या बद्दल ठाकरे यांनी टीका केली . 

मीरा भाईंदर यादव समाज सेवा संस्था चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने रामदेव पार्क भागात गोवर्धन पूजा कार्यक्रमात रविवारी रात्री ठाकरे दर्शनासाठी आले होते . यावेळी  खासदार राजन विचारे, उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर , लक्ष्मण जंगम , माजी नगरसेविका तारा घरत, पवन घरत सह यादव संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष रंगबहादूर यादव, अध्यक्ष उमेश यादव, सचिव आर.बी. यादव आदी उपस्थित होते.

श्रीरामाचे मंदिर होतेय गर्वाची गोष्ट आहे. जय श्रीराम हे हजारो वर्षां पासून म्हटले जात आहे . तुम्ही तर आता आलात . जय श्रीराम , जय बजरंगबली म्हटले कि सर्व हिंदू त्यांच्या बरोबर जातील असे त्यांना वाटते . ते हिंदूंच्या विरोधात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहेत . पण तुमची हुकूमशाही संपवण्याची शक्ती प्रभू श्रीराम व श्रीकृष्ण देईल.  

शिवसेनेचे हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारे आहे. नैसर्गिक आपत्ती , दंगे , अपघात कोणतीही आपत्ती आली तेव्हा शिवसैनिक जीवाची परवा न करता पुढे असतो व तेच आमचे हिंदुत्व आहे . हाच फरक आहे त्यांच्या आणि शिवसेनेच्या हिंदुत्वात. ९२ च्या दंगलीत शिवसेनेने हिंदूंना वाचवले . त्यावेळी भाजप कुठे होती ? मुंबई जळत होती तेव्हा एकटे बाळासाहेब आणि शिवसेना होती . अधर्माच्या विरुद्ध धर्माची रक्षा करणारी शिवसेना आहे . देशासाठी प्राण देणारे, देशाला आपले मानणारे हे सर्व आपलेच आहेत . आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे असे ठाकरे म्हणाले . 

मुंबईत सर्व पोटापाण्यासाठी आले . पण आता काम कुठे करणार  ? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सर्व उद्योग धंदे गुजरात मध्ये नेत आहेत . मग आता काय सर्व उठून गुजरात मध्ये कामासाठी जाणार का ?  इकडे राहणारे गुजराती पण  गुजरात मध्ये जाणार का ? गुजरात मजबूत होगा तो देश मजबूत होगा म्हणता, मग काय महाराष्ट्र , उत्तर प्रदेश व अन्य राज्ये मजबूत झाली तर देश मजबूत नाही होणार काय ?  असे सवाल ठाकरे यांनी केले . गुजरात मजबूत होत असेल करा त्या बद्दल आमचा विरोध नाही उलट आनंद आहे पण महाराष्ट्राचे हिरावून नको असे ठाकरे म्हणाले .  

कोरोनाच्या संकटकाळात आपण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राने जनतेसाठी देवीदेवतांच्या आशीर्वादाने मोठे प्रभावी काम केले .  मराठी आणि उत्तरभारतीय यांच्या ऐक्यात मीठ टाकण्याचे काम करणाऱ्यां पासून सावध रहा . आज पर्यंत शिवसेनेने आणि मी मुख्यमंत्री असताना जे कार्य केले त्याचा अनुभव लक्षात  ठेवत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अधर्माचा नाश करून धर्माचे सरकार आणायचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केले .