शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

तोतया सीबीआय अधिका-याने घातला ८५ लाखांचा गंडा, दारूविक्रीचा परवाना, नोकरीचे दाखवले आमिष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 04:42 IST

सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून एका महाठगाने ठाणे आणि गुजरातच्या काही व्यापाºयांना तब्बल ८५ लाख रुपयांना गंडा घातला आहे.

ठाणे - सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून एका महाठगाने ठाणे आणि गुजरातच्या काही व्यापाºयांना तब्बल ८५ लाख रुपयांना गंडा घातला आहे.ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये राहणारे महेश पालिवाल हे एका इन्शुरन्स कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून नोकरीला आहेत. डिसेंबर २०१५ मध्ये त्यांच्या वसईतील एका परिचितास ठाण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्या वेळी पालिवाल यांचा परिचय अनंतप्रसाद पांडे याच्याशी झाला. आपण सीबीआयच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे हेड आहोत, अशी ओळख त्याने करून दिली. मार्च २०१६ मध्ये पांडेने पालिवाल यांना मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये भेटीसाठी बोलावले. पालिवाल त्यांचा भावनगर येथील मित्र कृष्णकांत बगरिया याला सोबत घेऊन गेले. त्या वेळी दारूविक्रीचा एक परवाना उत्पादन शुल्क न भरल्याने बंद पडला असून तो २० ते २२ लाख रुपयांत विकत मिळू शकतो, असे पांडेने सांगितले. पालिवाल यांनी पत्नीच्या नावे दारूविक्रीचा परवाना घेण्याची तयारी दाखवली. मार्च ते आॅगस्ट २०१६ या काळात पालिवाल यांनी आरोपीला थोडेथोडे करून १६ लाख २६ हजार रुपये दिले. दारूचे दुकान भावनगर येथील मित्र कृष्णकांत बगरिया याला चालवायला द्यायचे, असे पालिवाल यांनी ठरवले होते. त्यानुसार, परवाना विकत घेण्यासाठी मदत म्हणून बगरियाच्या भावाने पाच लाखांचे कर्ज घेऊन त्याला रक्कम दिली.दारूविक्रीचा परवाना एक-दोन महिन्यांत मिळेल, असे पांडेने पालिवाल यांना सांगितले. चितळसर येथील म्हाडाच्या इमारतीमध्ये १० दुकाने खाली असून ती मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून मिळू शकतात, असेही त्याने सांगितले. पालिवाल यांनी हे मित्र खुबचंद सेजवानी यांना सांगितले. त्यांनी पाच दुकाने घेण्याची तयारी दर्शवली. या दुकानांसाठी पालिवाल यांनी सेजवानी यांच्याकडून ५० लाख घेऊन पांडेला दिले. दरम्यान चर्चगेट रेल्वे स्थानकावर स्टॉल उपलब्ध असल्याचे पांडेने सांगितले. पालिवाल यांनी गुजरातमधील त्यांचा मित्र युवराजसिंग गुलाबसिंग गिरासे याला ही बाब सांगितली. गिरासे यांनी त्यांच्या कार्यालयातील प्रफुल्ल कांतिलाल पटेल यांना ही आॅफर दिली. प्रफुल्ल यांनी त्यासाठी तीन लाख रुपये दिले.फेब्रुवारी २०१७ मध्ये पालिवाल आणि पांडे हे भरूच येथे गिरासे यांना भेटण्यासाठी गेले. त्या वेळी रेल्वेमध्ये टीसीची काही पदे रिक्त असून २० लाख रुपयांत नोकरी मिळू शकते, असे आरोपीने सांगितले. यासाठी गिरासे यांच्या परिचयातील काही रहिवाशांकडून आरोपीने १८ लाख ७५ हजार रुपये उकळले. दरम्यान नोव्हेंबर २०१७ मध्ये आरोपीचा मुलगा दुर्गेश पांडेच्या साखरपुड्यासाठी पालिवाल उत्तर प्रदेशात गेले. तेथे आरोपी अनंतप्रसाद पांडे हा सीबीआय अधिकारी नसून मुंबई पोलीस दलात शिपाई असल्याचे पालिवाल यांना समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शनिवारी कासारवडवली पोलिसांत तक्रार दिली.आरोपी मुंबई पोलीस दलात शिपाईतोतया सीबीआय अधिकारी बनून लोकांची फसवणूक करणारा अनंतप्रसाद पांडे हा मुंबई पोलीस दलात शिपाई असल्याचा दावा तक्रारदार महेश पालिवाल यांनी केला. वानखेडे स्टेडियमजवळ आपण त्याला हातात वॉकीटॉकी आणि कमरेला रिव्हॉल्व्हर लावून पोलिसांच्या गाडीत बसलेला पाहिले होते, असे पालिवाल यांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांचा हा दावा पडताळणे अद्याप बाकी असल्याचे कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले यांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा