शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डेब्रिज ठेकेदाराकडून लूट; ठामपा महासभेत सदस्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:19 IST

२० ऑगस्टपर्यंत अहवाल देण्याचे आदेश

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील डेब्रिज उचलणाऱ्या ठेकेदार कंपनीस आतापर्यंत आठ कोटी अदा करूनही शहरात अनेक ठिकाणी डेब्रिजचे साम्राज्य आहे. डेब्रिजवर प्रक्रिया करून त्यापासून पेव्हरब्लॉक, रेती, टाइल्स तयार करूनही ठेकेदार कंपनी नफा कमावत असून त्यासाठी महापालिकेने डायघर येथे मोफत जागाही दिली आहे. डेब्रिज उचलून त्यावर कंपनी अतिरिक्त पैसे आकारत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांनी शुक्रवारी महासभेत करून या प्रकरणाची चौकशीची मागणी केली. याबाबतचा अहवाल येत्या महासभेत सादर करण्याच्या सूचना महापौरांनी प्रशासनाला केल्या. यामुळे थीम पार्कपाठोपाठ ठाणे शहरात डेब्रिज घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे.शहरातील डेब्रिज उचलण्यासाठी महापालिका एका टनामागे १०५० रुपये अदा करते. त्यानुसार, एका ट्रकमधून १० ते १२ टन डेब्रिज नेले जाते. असे असतानाही ही कंपनी शहरातील डेब्रिज उचलत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. इतकेच नव्हे तर आयुक्तांच्या निवासस्थानाकरिता आरक्षित भूखंडावरील डेब्रिजही उचलण्याची तसदीही घेत नसल्याचे भाजपाच्या दीपा गावंड म्हणाल्या. डायघर येथे विविध उत्पादने करण्यासाठी जो प्रकल्प सुरू आहे, तिथे अद्यापही काहीच काम सुरू नसून प्रकल्पाचा केवळ दिखावा केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक बाबाजी पाटील यांनी केला.शहरात आतापर्यंत किती डेब्रिज उचलले, त्यापोटी किती रक्कम दिली, अशी विचारणा सभागृहनेते नरेश म्हस्के यांनी केली असता प्रदूषण विभागाच्या प्रमुख मनीषा प्रधान यांनी आतापर्यंत ४२ हजार टन डेब्रिज उचलले असून त्यापोटी आठ कोटी रुपये अदा केल्याची माहिती दिली.बिल्डरांकडून प्रतिट्रक दोन हजारांची अतिरिक्त कमाईस्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी, तर ही कंपनी शहरातील खाजगी बिल्डरांचे डेब्रिज उचलण्यासाठी दोन हजार रु पये प्रतिट्रक घेत असून महापालिकेकडूनही वेगळे भाडे घेते, असा गंभीर आरोप केला. माजी महापौर अशोक वैती यांनी या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी महापौर विरोधी पक्षनेते सभागृह नेते आदी दौरा करावा, अशी मागणी केली. राष्ट्रवादीच्या सुहास देसाई यांनी या प्रकल्पाची चौकशी करण्याची मागणी केली. कळवा परिसरात शेतकऱ्यांच्या जमिनीवर डेब्रिज टाकल्याने पिकांचे नुकसान झाले असल्याचे सेनेच्या नगरसेविका विजया लासे यांनी सांगितले. अशा प्रकारे डेब्रिजबाबत भ्रष्टाचार करणाºया कंपनीमागे कोण आहे, असा प्रश्न मीनल संख्ये यांनी केला. या संपूर्ण प्रकरणात असलेला हा गोल्डन ठेकेदार कोण, याची माहिती सभागृहाला द्या, अशी मागणी नजीब मुल्ला यांनी केली. विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनीही या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. अखेर, सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन महापौरांनी या संपूर्ण प्रकरणाचा एक अहवाल येत्या २० आॅगस्टच्या महासभेत सादर करण्याचे निर्देश दिले

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका