शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
2
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
3
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
4
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
5
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
6
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
8
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
9
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
10
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
11
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
12
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
13
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
14
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
15
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
16
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
17
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
18
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
19
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
20
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात

लाँग वीकेण्ड : पिकनिकच्या मूडवर आले ‘वरसावे विघ्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 2:08 AM

मुंबईतून इतर राज्यांत जाण्यासाठी ठाणे जिल्ह्याशिवाय पर्याय नाही. शेजारील गुजरात राज्यात जाणारी बहुसंख्य अवजड वाहने ठाणे शहरातूनच जात असल्याने व त्यापैकीच एक रसायनाने भरलेला टँकर गुरुवारी दुपारी वरसावे पुलाजवळ उलटल्याने सलग सुट्यांमुळे फिरायला निघालेल्या हजारो वाहनचालकांना सात ते आठ तासांच्या जीवघेण्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. कधी अपघातामुळे तर कधी दुरुस्तीच्या कामामुळे वरसावे पुलावरून होणारी वाहतूक बंद होते किंवा वळवलेली असल्याने प्रवाशांचे हाल होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

ठाणे : मुंबईतून इतर राज्यांत जाण्यासाठी ठाणे जिल्ह्याशिवाय पर्याय नाही. शेजारील गुजरात राज्यात जाणारी बहुसंख्य अवजड वाहने ठाणे शहरातूनच जात असल्याने व त्यापैकीच एक रसायनाने भरलेला टँकर गुरुवारी दुपारी वरसावे पुलाजवळ उलटल्याने सलग सुट्यांमुळे फिरायला निघालेल्या हजारो वाहनचालकांना सात ते आठ तासांच्या जीवघेण्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. कधी अपघातामुळे तर कधी दुरुस्तीच्या कामामुळे वरसावे पुलावरून होणारी वाहतूक बंद होते किंवा वळवलेली असल्याने प्रवाशांचे हाल होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.शुक्रवारपासून तीन दिवस सलग सुटी व त्यातच गुलाबी थंडीत झालेली वाढ अशा दुग्धशर्करा योगामुळे मुंबई, ठाण्यातील अनेक कुटुंबांनी बाहेरगावी जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, टँकर उलटल्याने त्यांच्या पिकनिकमध्ये वाहतूककोंडीचे विघ्न आले. वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याने आणि तासन्तास कोंडीत अडकल्याने कुठून ही अवदसा आठवली, अशी अनेकांची अवस्था झाली. वीकेण्डला वरसावे पूल परिसरात वाहतूककोंडी ही नित्याची बाब होऊन बसली आहे. मात्र, शहरातील मोठ्या प्रमाणात अवजड वाहने येजा करीत असतात. त्यामध्ये ज्वलनशील पदार्थ असलेले टँकर, भले मोठे कंटेनर यांचा समावेश आहे. प्रामुख्याने ही अवजड वाहने गुजरातकडे जाण्यासाठी ठाण्यातील घोडबंदर रोड, मुंबई-नाशिक महामार्गावरून जातात. गुरुवारी गुजरातकडे जाणारा टँकर वरसावे पुलाजवळ उलटल्याने घोडबंदर रोडवर वाहतूककोंडी झाली. शहरातून गुजरातकडे तातडीने जाण्यासाठी भिवंडीमार्गे वाहतूक वळवण्यात आली. भिवंडीतील रस्ते अरुंद असून कमालीचे खराब आहेत. त्यामुळे भिवंडीतून गुजरातच्या दिशेने जाताना प्रवाशांना अक्षरश: होडीत बसून प्रवास केल्याचा अनुभव आला. याचा फटका मुंब्रा रोडवरील वाहतुकीला बसला. शहरातील वाहतुकीवर याचा परिणाम झाला नसल्याचा दावा वाहतूक विभागाने केला.टँकर, कंटेनर असे अवजड वाहन उलटल्यावर वाहतूक पोलिसांना तत्परतेने त्याची माहिती देण्याऐवजी चालक तेथून थेट पळ काढतो. समजा, आजूबाजूने जाणा-या एखाद्या वाहनचालकाने तातडीने तक्रार द्यायचे ठरवल्यास अशा घटनांची सूचना देण्याकरिता शासनाने जाहीर केलेले हेल्पलाइन नंबर नादुरुस्त असतात. त्यामुळे फोन नं. १०० अथवा १०१ वर कॉल करण्याखेरीज पर्याय नसतो. हे नंबर नेहमीच बिझी असल्याने तेथे वारंवार फोन करण्याशिवाय गत्यंतर नसते. गुरुवारीही याच अनुभवातून अपघाताचे प्रत्यक्षदर्शी गेल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. टँकर अथवा कंटेनर उलटल्यावर तो उचलण्यासाठी ठाणे शहर वा ग्रामीण पोलिसांंकडे मोठ्या क्रेन उपलब्ध नसल्याने खाजगी मालकाकडून या क्रेन मिळवण्याकरिता खटपट करावी लागते. ती जर अगोदरच एखाद्या साइटवर कामात व्यस्त असेल, तर क्रेनसाठी बरीच यातायात करावी लागते. वाहतूक पोलिसांवर अक्षरश: क्रेनमालकांची हांजी-हांजी करण्याची वेळ ओढवते. क्रेनचा खर्च करण्यास उलटलेल्या टँकर-कंटेनरचा मालक तयार होत नाही. गुरुवारी याच समस्यांचे अग्निदिव्य पार पाडायला लागल्याचे वाहतूक पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यातच, रसायनाचा टँकर उलटल्यावर त्यातून बाहेर पडणाºया वायू अथवा रसायनांमुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्या भागात ही घटना घडली आहे, तेथील वाहतूक काही अंतरावर तासन्तास थांबवावी लागते. अनेक वाहनचालक घाईत असल्याने ते पोलिसांसोबत हुज्जत घालतात, वाद करतात. हेच चित्र गुरुवारी दिसले. वायुगळती थांबल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आली. पण, त्यासाठी सात ते आठ तास लागले.उलटलेला टँकर- कंटेनर हलवण्यास ठाण्यासारख्या शहरात यंत्रणा नाही, ही मूळ शोकांतिका आहे. त्यामुळे वरसावे पूल व आजूबाजूच्या परिसरातील वाहतूककोंडीत भर पडली. त्यातच लाँग वीकेण्ड असल्याने शहरातून बाहेर जाणाºया वाहनांची संख्या नेहमीपेक्षा जास्त असल्याने व्यवस्था साफ कोलमडली.गतवर्षी जुलैमध्ये सात तास कोंडी -ठाण्यातून वसईच्या दिशेने जाणारा एलपीजीचा टँकर ६ जुलै २०१७ रोजी दुपारी १ च्या सुमारास घोडबंदर रोडवरील काजूपाड्याजवळ असाच उलटला. या टँकरमधून अतिज्वलनशील वायूची गळती सुरू झाल्याने अत्यंत वर्दळीच्या अहमदाबाद-मुंबई महार्गावरील घोडबंदर रोडवरील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली होती. मदतकार्यासाठी भारत गॅसच्या तज्ज्ञ पथकास ठाण्यात बोलावण्यात आले होते. हा टँकर हलवण्यासाठी सात तास लागल्याने प्रवासी हैराण झाले होते.वीकेण्डला दुरुस्तीचा बसला होता फटकाकळवा-विटावा पुलाच्या दुरुस्तीचे काम २२ डिसेंबर २०१७ रोजी हाती घेतले होते. त्यामुळे या दिवसांत सर्वत्र वाहतूककोंडी दिसत होती. याचदरम्यान, वीकेण्डमुळे ठाणेकरांना कोंडीला सामोरे जावे लागले होते.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी