शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट - ठाण्याच्या सत्ताधाऱ्यांकडून ‘स्मार्ट सिटी’साठी अखेर ठाणे महापालिका प्रशासनाची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 15:08 IST

- सुरेश लोखंडेठाणे -  ‘ठाण्यात स्मार्ट सिटीची केवळ पायाभरणी...’ या मथळ्याखाली लोकमतने ऑनलाईनसह २८ ऑक्टोबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून ठाणेकरांचे लक्ष वेधले, याची दखल घेत ठाणे महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी झाडाझडती घेऊन पालिका प्रशासनाला धारेवर धरले आणि स्मार्टच्या निधीसह प्रकल्पांच्या कामांची वस्तुस्थिती ठाणेकरांसमोर सोमवारी मांडायला भाग पाडले.जिल्ह्यातील स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत ठाण्यासह कल्याण ...

- सुरेश लोखंडेठाणे -  ‘ठाण्यात स्मार्ट सिटीची केवळ पायाभरणी...’ या मथळ्याखाली लोकमतने ऑनलाईनसह २८ ऑक्टोबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून ठाणेकरांचे लक्ष वेधले, याची दखल घेत ठाणे महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी झाडाझडती घेऊन पालिका प्रशासनाला धारेवर धरले आणि स्मार्टच्या निधीसह प्रकल्पांच्या कामांची वस्तुस्थिती ठाणेकरांसमोर सोमवारी मांडायला भाग पाडले.

जिल्ह्यातील स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत ठाण्यासह कल्याण -डोंबिवली (केडीएमसी) आणि नवी मुंबई या तीन महानगरांचा समावेश होता; परंतु नवी मुंबईचा प्रस्ताव नामंजूर झाल्यानंतर आता ठाणे व कल्याण डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत आहेत. दोन वर्षाच्या कालावधीत या प्रकल्पाच्या केवळ पायाभूत आराखड्यासह प्रस्ताव मंजुरी आणि सल्लागार कंपन्यांच्या नियुक्ती पलिकडे या दोन्ही महापालिकांचा स्मार्टपणा दिसून आलेला नाही. यासाठी मंजूर झालेल्या निधीची कोणत्याही प्रकारची माहिती दिली नसल्याची खंत दिशाच्या आढावा बैठकीत खुद्द खासदार कपील पाटील यांनी देखील व्यक्त करून तीव्र नापसंती दर्शविली होती. याप्रमाणेच ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांनी लोकमतच्या वृत्ताची दखल घेवून शनिवार, रविवार सुटीचे दोन दिवस वगळता सोमवारी स्मार्टपणे पालिका प्रशासनाला जाब विचारून बोलते केले.

केंद्र शासन पुरस्कृत ‘स्मार्ट सिटी’ सुमारे पाच हजार ४०४ कोटी खर्चून ठाणे शहरात उदयाला येणार आहे. यासाठी ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड ( टीएससीएल) कंपनीला दोन वर्षात केंद्र शासनाचा १८६ कोटी, राज्य शासनाचा ९३ कोटी आणि महापालिकेचे स्वत:चे १०० कोटी आदी ३७९ कोटींचा निधी पडून आहेत. राज्याचे प्रधानसचिव यादीदेखील या निष्काळी व दुर्लक्षितपणाची दखल घेऊन महापालिकेला धारेवर धरले आहे. प्राप्त निधीतून स्मार्ट सिटीच्या कोणत्याही कामाला ठोसपणे अद्याप प्रारंभ करता आला नाही. असे टीएससीएलचे सीईओ ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना महापौर मिनाक्षी शिंदे, सभाग्रुह नेते नरेश म्हस्केआदी सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षाने पत्रकारांसमोर बोलायला भाग पाडले. हा कित्ता केडीएमसीने देखील गिरवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. एक हजार ४४४ कोटीं ४५ लाखांच्या स्मार्ट सिटीसाठी केडीएमसीने आतापर्यंत केवळ डीपीआर तयार करण्यासाठी केवळ सल्लागार संस्थेची नियुक्ती केली आहे. कल्याण स्टेशन परिसर सुधारणेच्या प्रकल्प अहवालासाठी सल्लागार कंपनी नियुक्त झाली. तर पॅनसिटी अंतर्गतच्या माहिती तंत्रज्ञान प्रकल्पासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती अद्याप गुलदस्त्यात आहे.