शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमध्ये महायुतीत तू तू मैं मैं; ठाणे लोकसभा उमेदवारीवरून टीकेचे बाण

By धीरज परब | Updated: March 22, 2024 10:51 IST

Lok Sabha Election 2024 Thane: एक वादग्रस्त व्यक्ती व्यक्तिगत स्वार्थासाठी स्वतःलाच भाजप असल्याचे दाखवण्याचा केविलवाणा खटाटोप करत असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड: ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, अशी उघड भूमिका मीरा-भाईंदर भाजपमधील एका गटाने घेतली आहे. त्यावरून युतीच्या उमेदवाराचा विरोध म्हणजेच पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची हॅट्ट्रिक करण्यास विरोध, अशी टीका शिवसेनेच्या शिंदे गटाने केली आहे. ठाणे लोकसभा कोणाकडे असावा, यावरून भाजप-शिंटे गटात मीरा-भाईंदरमध्ये तू तू मैं मैं सुरू आहे.

एक वादग्रस्त व्यक्ती व्यक्तिगत स्वार्थासाठी स्वतःलाच भाजप असल्याचे दाखवण्याचा केविलवाणा खटाटोप करत असल्याचा आरोपही शिंदे गटाने केला आहे. आ. प्रताप सरनाईक, माजी आ. रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के यांची शिवसेना शिंदे गटातून लोकसभेसाठी नावे चर्चेत आहे. मात्र मीरा-भाईंदरचे भाजपचे माजी आ. नरेंद्र मेहता यांनी आ. सरनाईक यांचे नाव न घेता त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे मतदारसंघ भाजपला मिळायला हवा व शिवसेना उमेदवाराचा प्रचार करणार नाही, अशी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचे मेहता यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे मेहता यांचे समर्थक मानले जाणारे भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी मात्र पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान व्हावेत ही भाजप कार्यकर्त्यांची इच्छा असून, कार्यकर्ते युतीचे काम करत आहेत, असे म्हटले आहे. पक्षश्रेष्ठी भाजप किंवा युतीचा जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्याचे काम कार्यकर्ते करतील, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेना शिंदे गटाचे मीरा-भाईंदर विधानसभा क्षेत्रप्रमुख विक्रमप्रताप सिंह यांनी सांगितले की, नरेंद्र मेहतांना देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी व्हावेत, अशी इच्छा नसावी, म्हणूनच ते युतीच्या उमेदवारास विरोध करत आहेत.

कार्यकर्ते युतीचा धर्म पाळणार

  • भाजप श्रेष्ठींच्या आदेशानुसार भाजप कार्यकर्ते काम करतील, असे भाजपचे मीरा- भाईंदर विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड. रवी व्यास यांनी सांगितले.
  • भाजप व युतीचे कार्यकर्ते पक्षादेशानुसार ठाणे लोकसभेच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी वचनबद्ध आहेत. त्यामुळे कोणी भाजप किंवा युतीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर कार्यकर्ते त्यांना ओळखून आहेत, असे आमदार गीता जैन यांनी सांगितले.
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४thaneठाणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा