शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवून देणार, भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांची माहिती

By नितीन पंडित | Updated: June 11, 2024 10:56 IST

Lok Sabha Election 2024 Result: भिवंडी लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा ६६  हजार २९२ मतांनी विजयी झाले. दोन वेळा खासदार  व केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री असलेले कपिल पाटील यांचा बाळ्यामामा यांनी पराभव केला आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम प्रथम करणार, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

- नितीन पंडित भिवंडीभिवंडी लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा ६६  हजार २९२ मतांनी विजयी झाले. दोन वेळा खासदार  व केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री असलेले कपिल पाटील यांचा बाळ्यामामा यांनी पराभव केला आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम प्रथम करणार, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

तुमच्या विजयाचे श्रेय तुम्ही कोणाला देता?  माझ्या विजयाचे संपूर्ण श्रेय हे नागरिकांचे आहे. ही निवडणूक नागरिकांनी आपल्या हातात घेतल्यानेच केंद्रीय राज्यमंत्र्यांचा पराभव करणे शक्य झाले. पाटील यांच्या दादागिरीला सामान्यांनी दिलेले हे उत्तर आहे. दहा वर्षे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री असूनही त्यांनी भिवंडीच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मतदारांनी आता त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी जे पेराल तेच उगवेल आणि याची प्रचिती पाटील यांच्या पराभवातून समोर आली आहे. 

भाजपमधील अंतर्गत वादाचा फायदा तुम्हाला झाला का? हो निश्चितच झाला. २०१४ मध्ये पहिल्यांदा मोदी लाटेचा त्यांना फायदा झाला होता, तर २०१९ मध्ये संपूर्ण शिवसेना त्यांच्या सोबत होती. मात्र ते निवडून आल्यानंतर मोठ्या गुर्मीत राहिले. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कमी लेखणे, मनमानी करणे यामुळे मुरबाड आणि भिवंडीतील नागरिक त्यांच्यावर नाराज होते. किसान कथोरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला दिलेली वागणूक चुकीची आहे. राजकारणात ‘हम करे सो कायदा’ अशी हेकेखोरी चालत नाही, हे बहुधा पाटील विसरले असावेत.

सांबरे यांच्या उमेदवारीमुळे तुमचा विजय झाला?  नीलेश सांबरे यांनी जातीचे राजकारण केल्यामुळे कुणबी मते निश्चितच त्यांच्या बाजूने वळली. मात्र मतदार मला साथ देतील यावर माझा विश्वास होता. त्यामुळे माझा विजय हा येथील नागरिकांमुळेच झाला असे मी मानतो.

खासदार म्हणून कुठल्या कामाला प्राधान्य असेल? नागरिकांना धमकावणे, त्यांच्या जमिनी बळकावणे अशी कामे खासदार कपिल पाटल यांनी केली आहेत. येथील नागरिकांना धीर व आधार देत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींवर पाटील व त्यांच्या गुंडांनी व कार्यकर्त्यांनी कब्जे केले आहेत ते शेतकऱ्यांना परत देण्याचे काम मी आधी करणार आहे. काल्हेर येथील सरकारी जमिनीवर केलेल्या अतिक्रमणांची मी पाहणी केली. 

नागरिकांचे कुठले प्रश्न सोडवणे गरजेचे आहे?  भिवंडीत सध्या वाहतूककोंडीची समस्या गंभीर झाली आहे. येथील रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून पावसाळ्यात होणारी वाहतूककोंडी तातडीने सोडविणे गरजेचे आहे.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४bhiwandi-pcभिवंडी