शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मतदार यादीतून नावं गायब; अनेक मतदार मतदानापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 14:22 IST

ठाणे शहरातील श्रीरंग विद्यालयाच्या मतदान केंद्रामध्ये तासन् तास उभे राहूनही प्रत्यक्ष मतदानासाठी क्रमांक येत नसल्यामुळे अनेक मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देठाणे शहरातील श्रीरंग विद्यालयाच्या मतदान केंद्रामध्ये तासन् तास उभे राहूनही प्रत्यक्ष मतदानासाठी क्रमांक येत नसल्यामुळे अनेक मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.व्हीव्हीपॅटद्वारे येणारी मतदानाची स्लीप पाहण्यातही सात सेकंदापेक्षा जास्त वेळ काही मतदार घेऊन रेंगाळत असल्यामुळेही हा वेळ लागत असल्याचा दावा मतदान अधिकाऱ्यांनी केला आहे.चरईतील शांती पॅलेस येथे राहणाऱ्या अमृतबेन छाडवा (58) आणि नानजी छाडवा (63) या दाम्पत्याला मात्र मतदान यादीत नावच नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

ठाणे - ठाणे शहरातील श्रीरंग विद्यालयाच्या मतदान केंद्रामध्ये तासन् तास उभे राहूनही प्रत्यक्ष मतदानासाठी क्रमांक येत नसल्यामुळे अनेक मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर व्हीव्हीपॅटद्वारे येणारी मतदानाची स्लीप पाहण्यातही सात सेकंदापेक्षा जास्त वेळ काही मतदार घेऊन रेंगाळत असल्यामुळेही हा वेळ लागत असल्याचा दावा मतदान अधिकाऱ्यांनी केला आहे.

चरईतील शांती पॅलेस येथे राहणाऱ्या अमृतबेन छाडवा (58) आणि नानजी छाडवा (63) या दाम्पत्याला मात्र मतदान यादीत नावच नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावता आला नाही. चरईतील दगडी शाळेत ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले होते. त्यांच्याकडे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रंही होती. गेल्या 30 वर्षापासूनचे छाडवा कुटूंब चरईत वास्तव्यास आहे. गेल्या 2014 च्या निवडणूकीत मतदान केलेलं असताना यावेळी मात्र मतदार यादीतील नावच गायब झाल्यामुळे ते प्रचंड नाराज झाले होते. मतदार चिठ्ठी घेऊनही त्यांच्याकडे निवडणूक कार्यालयातील कोणी फिरकले नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

अशोक जैन (48) हे चरईतील कृष्णा हेरिटेज इमारतीमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांनी संतोषीदेवी (46) तसेच चिराग (26) आणि सुमित (24) या दोन मुलांचाही पत्ता बदलल्याचे पत्र मे 2018 मध्येच दिले. मात्र आठ ए च्या फार्म ची प्रक्रिया बाकी असल्याचं त्यांना एप्रिल 2019 मध्ये सांगण्यात आले. विशेष म्हणजे पत्नी आणि मुलांची नावे मतदार यादीत आली. पण अशोक यांचे स्वत:चे नाव मात्र यादीत आलेच नसल्यामुळे त्यांनीही निवडणूक आयोगाच्या या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानासाठी आतापर्यंत मतदारांनी काहीसा निरुत्साह दाखवला आहे. महाराष्ट्रात दुपारी 12 वाजेपर्यंत 17.24 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मुंबईतल्याईशान्य मतदारसंघासह सहा लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान पार पडत आहे. निवडणुकीत मुंबईतून 116 उमेदवार नशीब आजमावत आहेत. मुंबईतल्या सहाही जागांवर महायुती आणि आघाडीत थेट लढत असली, तरी वंचित बहुजन आघाडी आणि मनसेमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत मुंबईने एकतर्फी कौल दिला होता. 2014साली सर्व जागा युतीकडे तर त्या आधी 2009 साली सहाही जागा आघाडीकडे होत्या. एकाच पारड्यात दान टाकण्याची प्रथा यंदा कायम राहणार की बदलणार, याबाबत उत्सुकता आहे.

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthaneठाणेthane-pcठाणेVotingमतदान