शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

EVM मशीन ठेवण्यासाठी क्रिडासंकुलाचा ताबा, वापरावर निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 11:32 IST

लोकसभा निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून  केडीएमसीची मालमत्ता असलेल्या डोंबिवलीतील क्रिडा संकुलाचा ताबा घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून  केडीएमसीची मालमत्ता असलेल्या डोंबिवलीतील क्रिडा संकुलाचा ताबा घेण्यात आला आहे. अन्य पर्याय उपलब्ध असताना क्रिडासंकुलाचा अट्टाहास का? असा सवाल खेळाडूंनी केला आहे.आयोगाच्या या मनमानी कारभाराचा निषेध म्हणून व्यायामपटूंनी क्रिडासंकुलाच्या आवारात आज प्रतिकात्मक आंदोलन छेडले.

डोंबिवली - लोकसभा निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी निवडणूक विभागाकडून  केडीएमसीची मालमत्ता असलेल्या डोंबिवलीतील क्रिडा संकुलाचा ताबा घेण्यात आला आहे. या ठिकाणी EVM मशीन ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव येथील जलतरण तलाव आणि व्यायामशाळेच्या वापरावर टाच येणार आहे. अन्य पर्याय उपलब्ध असताना क्रिडासंकुलाचा अट्टाहास का? असा सवाल खेळाडूंनी केला आहे. दरम्यान आयोगाच्या या मनमानी कारभाराचा निषेध म्हणून व्यायामपटूंनी क्रिडासंकुलाच्या आवारात आज सकाळी प्रतिकात्मक आंदोलन छेडले.

कल्याण लोकसभेचे मतदान 29 एप्रिलला होणार आहे. तत्पुर्वी निवडणूक यंत्रणेचे कामकाज जोमाने सुरू झाले असून मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेदरम्यान लागणारे साहित्य ठेवण्यासाठी क्रिडासंकुलाचा ताबा घेण्यात आला आहे. ताबा घेण्यापूर्वी  क्रिडासंकुलातील व्यायामशाळा व जलतरण तलाव बंद करून मुलांच्या खेळावर टाच आणू नये असे पत्र शिवसेनेचे कल्याण ग्रामीण व पूर्व विधानसभा क्षेत्र संघटक कैलास शिंदे यांनी निवडणुक विभागाला दिले होते तसेच केडीएमसीचे सभागृहनेते श्रेयस समेळ यांनीही आयुक्तांना पत्र पाठवून तरण तलावाची जागा देऊ नका असे स्पष्ट केले होते. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहरअध्यक्ष राजेश कदम यांनीही  नाराजी व्यक्त केली होती. परंतू जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रनुसार महापालिका प्रशासनाने जागेचा ताबा निवडणुक विभागाकडे दिला आहे. दरम्यान याचा निषेध म्हणून व्यायामपटूंनी प्रतिकात्मक आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. याबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदनही देण्यात आले होते. निवडणूक आयोगाचा निर्णय जैसे थे राहील्याने आज सकाळी क्रिडासंकुलात आयोगाच्या कारभाराचा निषेधार्थ व्यायामपटूंनी व्यायाम करून प्रतिकात्मक आंदोलन छेडले. यामध्ये मोठया संख्यने व्यायामपटू सहभागी झाले होते.  

क्रिडा संकुलातील तरणतलावाचा उपभोग घेणारे 630 आसपास आजीवन सदस्य आहेत. व्यायामशाळेचा देखील मोठया प्रमाणावर वापर होतो. तर आता उन्हाळी सुट्टीचा मोसम सुरू होणार असल्याने याठिकाणी येणाऱ्यांची संख्या अधिक वाढणार आहे. परिक्षा संपल्यानंतर मुले सुट्टीमध्ये खेळासाठी देखील या क्रिडासंकुलाचा वापर करतात. परंतू निवडणुकीने ताबा घेतल्याने त्यांच्या खेळावर विरजण पडणार आहे. हे टाळण्याकरीता व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटयगृह घेतल्यास सर्व बाजूने सोयीस्कर होईल याकडे व्यायामपटूंनी लक्ष वेधले होते. 

आम्ही आजीवन सदस्य आहोत मग निवडणुकीच्या काळात जी आमची गैरसोय होणार आहे त्याचे पैसे केडीएमसी परत देणार आहे का? असा सवाल व्यायामपटूंनी केला आहे. आयोगाच्या कारभाराचा निषेध म्हणून निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला. याबाबतचे जाहीर फलक बाजुकडील घरडा सर्कल परिसरात व्यायामपटूंकडून लावण्यात आले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdombivaliडोंबिवली