शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ठाकुर्लीतील पदपथांवरील झाकणे तुटली, केडीएमसीचे होतेय दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 01:06 IST

ठाकुर्ली पूर्वेतील रेल्वे समांतर रस्त्याकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. म्हसोबा चौकातील पदपथावरील काही झाकणे तुटली आहेत, तर काही ठिकाणी ती गायब झाली आहेत.

डोंबिवली - ठाकुर्ली पूर्वेतील रेल्वे समांतर रस्त्याकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. म्हसोबा चौकातील पदपथावरील काही झाकणे तुटली आहेत, तर काही ठिकाणी ती गायब झाली आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथावरून चालणे मुश्किल झाले आहे. तर, दुसरीकडे झाकणे गायब झाल्याने धोक्याची सूचना म्हणून त्यावर ‘नो-पार्किंग’चा फलक आडवा करून ठेवला आहे.रेल्वे समांतर रस्ता आणि ९० फुटी रस्त्यालगत मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. त्यामुळे येथे लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात येथे पुरेशा सुविधा दिलेल्या नाहीत. वाहनतळ नसल्याने चाकरमानी सकाळी म्हसोबा चौकातच आपली वाहने उभी करून ठाकुर्ली स्थानक गाठतात. वाढत्या दुचाकींमुळे तेथे वाहतुकीचे नियोजन योग्य प्रकारे व्हावे, यासाठी काही महिन्यांपूर्वी केडीएमसीने नो-पार्किंगचे फलक म्हसोबा चौकात लावले होते. परंतु, ठोस कृतीअभावी निरूपयोगी ठरलेले ते फलक आता पदपथावरील गायब झालेल्या झाकणांच्या ठिकाणी उपयोगात आणले जात आहेत.या फलकांची दांड्यासकट मोडतोड करून वापर केला गेल्याचेही स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर तुटलेल्या झाकणांच्या ठिकाणी गोणपाट तसेच फडक्याचा वापर केला गेला आहे. या पदपथाचा वापर पादचारी, सकाळी-सायंकाळी वॉकला जाणारेही करतात. परंतु, गटारांकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाल्याने अपघाताची शक्यता आहे.दरम्यान, बेकायदा ढाबे, टपऱ्यांचे साम्राज्य येथे वाढलेले असताना आजूबाजूला निर्माण होत असलेला कचरा रस्त्यालगतच्या झाडांच्या भोवताली असलेल्या ट्री-गार्डमध्ये सर्रासपणे गोळा केला जात आहे.कच-याचे ढिगनवीन ठाकुर्ली परिसराला कार्पाेरेट लूक लाभला असलातरी कल्याण दिशेने जाणाºया मार्गालगतच्या भिंतीच्या पलिक डे मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या मार्गावर काही ठिकाणी कचºयाचे ढिग साचले आहेत. या परिसरात सायंकाळी तरुण-तरुणी व ज्येष्ठ नागरिक विरंगुळ्यासाठी येतात. मात्र, त्यांना कचºयाच्या दुर्गंधीमुळे नाक मुठीत धरून वावरावे लागत आहे. तसेच डासांचाही त्रासही त्यांना होत आहे.‘शिवमार्केट’मधील पदपथ धोकादायकपूर्वेतील शिवमार्केट प्रभागातील टाटा पॉवर लेन परिसरातील आस्था रुग्णालय आणि फतेह अली रोडवरील मशिदीनजीकच्या पदपथावरील गटारांची झाकणे तुटली आहेत. त्यामुळे ती तातडीने बदलण्याची मागणी होत आहे.आस्था रुग्णालयानजीकच्या पदपथावरील गटाराचे झाकण तुटल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे जुने झाकण तत्काळ बदलावे. अन्य ठिकाणीही तातडीने चांगल्या दर्जाची झाकणे बसवावीत, अशी मागणी डॉ. मंगेश पाटे यांनी केली आहे.नगरसेवक विश्वदीप पवार म्हणाले, पालिकेकडे ५० झाकणे मागितली होती. परंतु, अवघी सात मिळाली. आता पुन्हा झाकणे मागितली आहेत. तुटलेली झाकणे तत्काळ बदलली जातील.

टॅग्स :dombivaliडोंबिवली