शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेच्या आसनगाव-अटगाव डाऊन मार्गावर लोकलचे डबे घसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 09:02 IST

सकाळी साडेसातच्या सुमारास एक लोकल आसनगावहून आटगावच्या दिशेने जात असताना या लोकलचे डबे रुळावरून घसरले.

कल्याण - मध्य रेल्वेच्याकल्याण कसारा मार्गावर आसनगाव-आटगाव स्थानकांदरम्यान लोकलचे डबे रुळावरून घसरून दुर्घटना घडली असून, या अपघातामुळेमध्य रेल्वेची आटगाव ते कसारा या डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र या दुर्घटनेत कुठलीही हानी किंवा कुणीही जखमी झालेले नाही अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

आज सकाळी ७ वाजून २८ मिनिटाच्या सुमारास मध्य रेल्वेच्या आटगाव स्टेशन जवळ लोकलचा 4 था डबा रुळावरून घसरला. ही लोकल कसारा कडे येत होती. लोकलचा डबा रेल्वे रुळावर घसरल्याने  आटगाव  ते कसारा वाहतूक ठप्प झाली. या लोकलच्या डब्यात 10 ते 12 प्रवासी होते. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचा मध्य रेल्वेने दावा केला आहे. या अपघाताची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन लोकलचा डबा रेल्वे रुळावरून दूर करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. लोकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. तसेच कसारा-कल्याण अप मार्गावरील वाहतुकीवर या अपघाताचा कुठलाही परिणाम झालेला नाही. तर केवळ आटगाव कसारा या डाऊन मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. 

 

दरम्यान, करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासास बंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील कामगारांनाच रेल्वेतून प्रवासास मुभा देण्यात आली आहे. अत्यंत कमी प्रमाणात लोकांना प्रवासाची मुभा देण्यात आल्याने लोकलच्या फेऱ्याही मर्यादित प्रमाणात चालवण्यात येत आहेत.परिणामी  जर नियमित प्रमाणे लोकल सेवा सुरु असती व नियमित प्रमाणे गर्दी असती तर मोठा अनर्थ झाला असता. लोकल चा डब्बा रुळावरून कशामुळे घसरला याबाबत चा खुलासा अदयाप मध्य रेल्वे कडून करण्यात आलेला नाही. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेkalyanकल्याणthaneठाणेAccidentअपघात