शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी योजना : ३०० लाभार्थ्यांचा शोध सुरू, वृद्धत्वामुळे पुरावे देणे अशक्य झाल्याने राहिले वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 06:46 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र असलेल्या परंतु वृद्धत्वामुळे बोटांचे ठसे स्कॅन करता न आल्याने अद्याप लाभ न झालेल्या सुमारे ३०० शेतक-यांचा शोध घेऊन त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

- सुरेश लोखंडेठाणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र असलेल्या परंतु वृद्धत्वामुळे बोटांचे ठसे स्कॅन करता न आल्याने अद्याप लाभ न झालेल्या सुमारे ३०० शेतक-यांचा शोध घेऊन त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याच्या हालचाली सुरू आहेत.जिल्ह्यात एक हेक्टर शेती असलेल्या आठ हजार ८३२ लहान शेतकºयांचा, तर दोन हेक्टरपर्यंतच्या पाच हजार २५८ मध्यम शेतकºयांचा समावेश आहे. उर्वरित ७३८ मोठे शेतकरी आहेत. जिल्ह्यातील नऊ हजार ८२८ शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये पात्र असलेल्या पण बोटांचे ठसे स्कॅन न झाल्यामुळे योजनेचा लाभ न झालेल्या सुमारे २५० ते ३०० वयोवृद्ध शेतकºयांचा समावेश आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांनाही या कर्जमाफीचा लाभ देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे डीडीआर एस.एम. पाटील यांनी सांगितले. या विषयावर मंत्रालयात चर्चा झाल्याचे ते म्हणाले.सुमारे दीड लाख कर्ज असलेल्या शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. दीड लाखापेक्षा कमी कर्ज असलेल्या ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ७३५ शेतकºयांच्या खात्यात ४५ कोटी ७९ लाख २३२ रुपये जमा केले आहेत. त्यापैकी सात हजार ४९८ थकबाकीदार शेतकºयांना ३४ कोटी ४९ लाख ३१ हजार २८ रु पये, प्रोत्साहनपर रकमेचा लाभ मिळाला आहे.दीड लाख कर्ज असलेल्या शेतकºयांना माफीसुमारे दीड लाख कर्ज असलेल्या शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. दीड लाखापेक्षा कमी कर्ज असलेल्या ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ७३५ शेतकºयांच्या खात्यात ४५ कोटी ७९ लाख २३२ रुपये जमा केले आहेत. दीड लाखाच्यावर थकबाकीची रक्कम असलेले ठाणे जिल्ह्यात एक हजार ७३७ व पालघरमधील एक हजार ४८८ असे मिळून तीन हजार २२५ शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. परंतु, त्यांच्याकडील थकबाकी असलेली २८ कोटी ५६ लाख १३ हजार ९०२ रुपये त्यांनी ३१ मार्च २०१८ पर्यंत त्यांना भरणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे