शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बदलापुरात विजेचा 'रात्रीस खेळ चाले';  पिक अवर्समध्ये लोडशेडींग 

By पंकज पाटील | Updated: May 15, 2023 16:03 IST

पिक अवर्स म्हणजे रात्री १०.३० ते १२.३० दरम्यान लोड वाढल्यास लोड शेडींग केले जाणार आहे.   

बदलापूर: ओव्हरलोडींगमुळे लाईन ट्रिपिंग टाळण्यासाठी लोड शेडींग करण्याचे निर्देश  महावितरणला देण्यात आले आहेत. रविवारी (ता.१४) यासंदर्भातील ईमेल महापारेषण कंपनीकडून महावितरणला पाठवण्यात आला आहे. त्यानुसार पिक अवर्स म्हणजे रात्री १०.३० ते १२.३० दरम्यान लोड वाढल्यास लोड शेडींग केले जाणार आहे. 

सध्या कडक उन्हाळा सुरू असून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे विजेचा विशेषतः पंखे, कुलर,एसी आदी उपकरणांचा वापर वाढला आहे. या उपकरणसाठी अधिक वीज लागत असल्याने विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात १०० केव्ही क्षमतेच्या अंबरनाथ सबस्टेशनच्या लाईनवरील लोड पीक अवर्स दरम्यान म्हणजेच रात्री १०.३०  ते १२.३० दरम्यान ६३० अम्पियर पर्यंत पोहोचतो. अशा परिस्थितीत स्विचिंग फीडर वरून १०० ते १५० अम्पियर लोड रिलीफ करणे आवश्यक आहे.

तसे न केल्यास ओव्हरलोडिंगमुळे लाईन ट्रिपिंगची शक्यता असते. त्यातून पडघ्यावरून येणाऱ्या मेन लाईंनवरही ट्रिपिंग होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास संपूर्ण शहर अंधारात जाऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यास एक ते दीड तासाहून अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे वीज ग्राहकांची मोठी गैरसोय होऊन महापारेषण व महावितरणला आर्थिक फटकाही बसू शकतो. या पार्श्वभूमीवर २२ केव्हीं  क्षमतेच्या अंबरनाथ स्विचींग १, अंबरनाथ स्वीचींग २, मोहन सबरबिया स्विचींग व सोनिवली स्वीचींग स्टेशनवरील लाईन्सवर रात्री १०.३०  ते १२.३० दरम्यान लोड वाढल्यास लोड शेडींग केले जाणार असल्याची माहिती महावितरणच्या अभियंत्यांनी दिली. एकाच वेळी हे लोड शेडिंग न करता अर्धा अर्धा तास वेगवेगळ्या भागात हे लोडशेडींग केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रात्रीच्या वेळी नागरिकांनी एसी व तत्सम उपकरणांचा वापर कमी केल्यास लोड कमी राहू शकेल,असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :badlapurबदलापूरelectricityवीज