शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील पालिकांवर मेट्रोने टाकला ५६२ कोटींचा भार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 05:30 IST

आपल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मेट्रो प्रकल्पांतील स्थानकांच्या परिसरांत उभारण्यात मल्टिमोडल इंटिग्रेटेड अर्थात बहूवाहतूक परिवहन प्रकल्पाच्या उभारणीतील खर्चाचा ५० टक्के भार हा त्यात्या महापालिकांच्या शिरावर एमएमआरडीएने टाकला आहे.

- नारायण जाधवठाणे : आपल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मेट्रो प्रकल्पांतील स्थानकांच्या परिसरांत उभारण्यात मल्टिमोडल इंटिग्रेटेड अर्थात बहूवाहतूक परिवहन प्रकल्पाच्या उभारणीतील खर्चाचा ५० टक्के भार हा त्यात्या महापालिकांच्या शिरावर एमएमआरडीएने टाकला आहे. यामुळे मुंबई महापालिका वगळता ठाणे, भिवंडी, मीरा-भार्इंदर, कल्याण-डोंबिवलीसह पनवेल या पालिकांवर ६१२ कोटी ५० लाखांचा बोजा पडणार आहे. उर्वरित २८५० कोटी ७२ लाखांचा भार मुंबई महापालिकेस सहन करावा लागणार आहे.मुंबई वगळता इतर महापालिका आर्थिकदृष्ट्या खंगलेल्या असल्याने त्या हा भार कितपत सहन करतात, हा प्रश्न आहे. एमएमआरडीएच्या १२ मेट्रो प्रकल्पांत १५५ स्थानके असून यातील बहूवाहतूक परिवहन प्रकल्पांचा खर्च हा प्रत्येक स्थानकासाठी २५ कोटी रुपये असून त्यातील साडेबारा कोटी रुपयांचा भार त्यात्या ठिकाणच्या पालिकांनी उचलावा, असा निर्णय एमएमआरडीएच्या १४८ व्या बैठकीत घेण्यात आला आहे.भिवंडी मनपावर ७५ कोटींचा बोजाअशाच प्रकारे ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो-५ च्या मार्गातील एकूण स्थानकांपैकी अंजूरफाटा, धामणकरनाका, भिवंडी, गोपालनगर, टेमघर आणि राजनोलीनाका ही सहा मेट्रो स्थानके भिवंडी महापालिका हद्दीत येतात. त्यांच्या परिसरातील बहूवाहतूक परिवहन प्रकल्पासाठी दीडशे कोटी खर्च अपेक्षित असून त्यातील निम्मा अर्थात ७५ कोटींचा भार भिवंडी महापालिकेस सहन करावा लागणार आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेवर १३७.५० कोटींचा भारमीरा-भार्इंदर महापालिका हद्दीत गायमुख ते काशिमीरा आणि दहिसर ते भार्इंदर असे दोन प्रस्तावित मार्ग आहेत. यातील गायमुख ते काशिमीरा या मार्गावर चेणे, वरसावे, लक्ष्मीबाग आणि शिवाजी चौक ही चार स्थानके, तर दहिसर ते भार्इंदर या मार्गावर पांडुरंगवाडी, मीरागाव, काशीगाव, साईबाबानगर, मेडतियानगर, शहीद भगतसिंग उद्यान आणि नेताजी बोस मैदान ही सात अशी ११ स्थानके बांधण्यात येणार असून त्यांच्या हद्दीतील बहूवाहतूक परिवहन प्रकल्पासाठीच्या २७५ कोटींपैकी १३७ कोटी ५० लाखांचा भार हा मीरा-भार्इंदर महापालिकेवर पडणार आहे.केडीएमसीवर १८७ कोटी ५० लाखांचा बोजाखंगलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतूनही दोन मेट्रो जाणार आहेत. यात ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो-५ च्या मार्गातील दुर्गाडी, सहजानंद चौक, कल्याण रेल्वेस्थानक आणि कल्याण एपीएमसी ही चार स्थानके, तर कल्याण-तळोजा मार्गातील गणेशनगर, पिसवली, गोळवली, डोेंबिवली, एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजे अशी १५ स्थानके आहेत. या स्थानकांच्या परिसरांतील बहूवाहतूक परिवहन प्रकल्पांच्या उभारणीसाठी प्रत्येकी २५ कोटी याप्रमाणे सर्व १५ स्थानके मिळून ३७५ कोटी खर्च अपेक्षित असून त्यातील ५० टक्के अर्थात १८७ कोटी ५० लाख रुपयांचा बोजा कल्याण-डोंबिवली पालिकेस सहन करावा लागणार आहे.बहुवाहतूक परिवहन प्रकल्पात मिळणार १७ सुविधाआपले घर किंवा कार्यालय ते मेट्रो स्थानकादरम्यानचा प्रवास सुकर व जलदगतीने व्हावा, अशा प्रकल्पाचा मुख्य हेतूने स्थानकांच्या ५०० मीटर त्रिज्येच्या वर्तुळात पादचारी मार्ग रु ंदीकरण व सायकल ट्रॅक, वाहतूक व चौक सुधारणा, रहदारी सिग्नल, जमिनीवरील व तिच्या खालील सुविधांची पुनर्रचना, पार्किंग, रस्त्यावरील पार्किंगला प्रतिबंध, रस्त्यावरील दिवाबत्ती, बस-वे ची पुनर्रचना, खाजगी वाहनांमार्फत पिकअप व ड्रॉपसेवा, मेट्रो स्थानकापर्यंत येजा करणाऱ्या बस तसेच विजेवर चालणारी वाहने, दिशादर्शक तसेच माहितीफलक, सीसीटीव्ही, पादचारी पूल, स्कायवॉक, रस्त्यालगत बसण्यासाठी बाकडी, पाणपोई, सार्वजनिक सायकलथांबे, अशा १७ सुविधांचा या उपक्र मात समावेश आहे.ठाणे महापालिकेवर १६२.५० कोटींचा भारवडाळा-कासारवडवली मार्गावर तीनहातनाका, आरटीओ जंक्शन, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली ही ११ स्थानके, तर गायमुख-मीरा रोड मार्गावरील गायमुख हे एक आणि कासारवडवली ते भिवंडी-कल्याण मार्गावरील बाळकुमनाका अशी १३ स्थानके आहेत. त्यांच्या परिसरातील बहूवाहतूक परिवहन प्रकल्पासाठी ३३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यातील १६२ कोटी ५० लाख रुपयांचा भार ठाणे पालिकेवर येणार आहे.पनवेल महापालिकेवर५० कोटींचा भारनव्याने उदयास आलेल्या पनवेल महापालिकेच्या हद्दीत कल्याण-तळोजा मार्गातील तुर्भे, पिसवे डेपो, पिसवे आणि तळोजा ही चार मेट्रो स्थानके प्रस्तावित आहेत. त्यांच्या हद्दीतील बहूवाहतूक परिवहन प्रकल्पांच्या उभारणीसाठी प्रत्येकी २५ कोटी याप्रमाणे चार स्थानकांसाठी १०० कोटी असून त्यातील निम्मा अर्थात ५० कोटींचा भार पनवेल महापालिकेस सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोthaneठाणे