शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

उत्तन समुद्रातील आणखी ३ खडकांवर होणार दीपस्तंभ ; मच्छीमारांना बोटीने ये - जा करण्यात मिळणार सुरक्षित वाट

By धीरज परब | Updated: February 3, 2024 21:36 IST

दीपस्तंभ मुळे मच्छीमारांना काळोखात खडकांवर बोटी आदळून होणाऱ्या अपघातां पासून सुटका मिळणार आहे . 

मीरारोड - भाईंदर उत्तन जवळील खोल समुद्रात  सऱ्याची वाट, कातल्याची वाट, वाशी खडक येथील खडकांवर प्रत्येकी एक प्रमाणे एकूण ३ दीपस्तंभ उभारले जाणार असून त्याचे भूमिपूजन शनिवारी सायंकाळी समुद्रातील खडकांवर खासदार राजन विचारे यांनी केले . दीपस्तंभ मुळे मच्छीमारांना काळोखात खडकांवर बोटी आदळून होणाऱ्या अपघातां पासून सुटका मिळणार आहे . 

भाईंदरच्या उत्तन समुद्र किनाऱ्यावरील उत्तन , पाली , चौक येथील मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात जाताना व मासेमारी करून परत येताना समुद्रातील खडक हे रात्रीच्या वेळी अडचणीचे ठरतात . किनाऱ्या कडे येताना खडक न दिसल्याने बोट खडकावर आदळून बोटींचे अपघात व नुकसान होत असे . 

मच्छीमारांच्या मागणी नंतर ह्या आधी खासदार राजन विचारे यांनी खुट्याची वाट येथे सन २०१८-१९ च्या जिल्हा नियोजन विभागाकडून ७२ लाखाचा निधी मंजूर करून दीपस्तंभाचे काम पूर्ण करून घेतले होते . त्यानंतर मच्छीमारांच्या मागणीनुसार सऱ्याची वाट, कातल्याची वाट, वाशी खडक येथील तीन खडकांवर सुद्धा दीपस्तंभ उभारण्यासाठी खा. विचारे यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा चालवला होता . त्यासाठी सन २०२१-२२ च्या जिल्हा नियोजन मधून ३ कोटी ५२ लाख निधीची मंजुरी मिळाली होती . 

 परंतु पर्यावरणाच्या मंजुऱ्या न मिळाल्याने सदर कामे सुरु करता येत नव्हती. यासाठी दिल्ली येथे पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय विभागाचे कोस्टल झोन रेग्युलेशन संचालक यांच्याकडे खा. विचारे यांनी पाठपुरावा करून सदर परवानगी मिळवली. सर्व परवानग्या मिळाल्या नंतर ह्या तिन्ही दीपस्तंभाच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले होते .  शनिवारी सायंकाळी या कामाचा शुभारंभ खासदार राजन विचारे यांनी समुद्रात बोटीने जावून मच्छीमारांसह केला . 

  यावेळी मच्छीमार नेते बर्नड डिमेलो,  माजी नगरसेवक जॉर्जी गोविंद,  शर्मिला बगाजी, माल्कम कासुघर सह शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख  लक्ष्मण जंगम, माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण पाटील, महिला शहर संघटक तेजस्वि पाटील,  उपशहर प्रमुख अशोक मोरे, विनायक नलावडे, सम्राट राऊत आदी उपस्थित होते . 

उत्तन परिसरात मच्छीमारांसाठी जिल्हा नियोजन मधून डोंगरी चौक येथील लाईट हाउस साठी ९ लाख व डोंगरी चौक जेट्टीसाठी ५ कोटी मंजूर झालेले आहेत. लवकरच हि कामे सुरु होतील.  वेलंकनी येथे १० रॅम्पची दुरुस्ती व रस्ते विकसित करण्यासाठी ३ कोटी ३५ लाखाचा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे असे खा . राजन विचारे यांनी यावेळी मच्छीमारांशी बोलताना सांगितले .