शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा, ठाणे सत्र न्यायालयाचा निर्णय

By जितेंद्र कालेकर | Updated: December 8, 2022 20:47 IST

ठाण्याच्या लोकमान्यनगर येथील घटना

ठाणे: मेव्हण्याने घेतलेल्या पैशांवरुन झालेल्या वादातून विमल माळी या ४८ वर्षीय पत्नीचा खून करणाºया हिरालाल माळी (५६) या पतीला सश्रम कारावासाच्या जन्मठेपेसह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठाण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी बुधवारी ठोठावली आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 

आपल्या भावाकडून उसनवारीने घेतलेले पैसे गावची जमीन विकून दिवाळीच्या आत परत करा, अशी मागणी विमल हिने तिचा पती हिरालाल याच्याकडे केली होती. यातून गुडीपाडव्याच्या आत हे पैसे परत करतो, असे सांगून पत्नीची हिरालालने समजूत घातली होती. मात्र, तरीही ती जोरजोरात भांडत असल्याने रागाच्या भरात हिरालाल याने लोखंडी सळईने पत्नीच्या 

डोक्यात दोन ते तीन फटके मारले. यात ती जमिनीवर पडल्यानंतर उशिने तिच्या तोंडावर दाब देऊन तिचा खून केला. त्यानंतर घराबाहेर पडून मुलगा रोहित आणि पोलिसांना हिरालालने ही माहिती दिली. ही घटना १३ आॅक्टोबर २०१५ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली होती.  गुन्हा दाखल झाल्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी हिरालाल याला अटक केली होती. याच खटल्याची  सुनावणी ठाणे सत्र न्यायालयात ७ डिसेंबर २०२२ रोजी झाली.  सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी १५ साक्षीदार पडताळून आरोपीला शिक्षा होण्यासाठी बाजू मांडली. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. जी. गावीत यांनी तपासी अधिकारी तर पैरवी अधिकारी म्हणून करुणा वाघमारे यांनी काम पाहिले. सर्व बाजू पडताळल्यानंतर आरोपी  हिरालाल याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी