शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

धाकटया व्यसनी भावाचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 00:06 IST

दारुसाठी पैसे मागितल्यानंतर ते न दिल्यामुळे शिवीगाळ करणाºया धाकटया आकाश (१९) या व्यसनी लहान भावाचा लाकडी दांडक्याने खून करणाºया सुनिल तुकाराम माने (२८) या मोठया भावाला ठाणे न्यायालयाने नुकतीच जन्मठेपेची तसेच एक हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

ठळक मुद्दे ठाणे न्यायालयाचा निर्णय भिवंडीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: दारुसाठी पैसे मागितल्यानंतर ते न दिल्यामुळे शिवीगाळ करणाºया धाकटया आकाश (१९) या व्यसनी लहान भावाचा लाकडी दांडक्याने खून करणाºया सुनिल तुकाराम माने (२८) या मोठया भावाला ठाणेन्यायालयाने नुकतीच जन्मठेपेची तसेच एक हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिना कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.आईनेच याप्रकरणी आपल्या मुलाविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मुख्य न्यायाधीश आर. एम. जोशी यांच्या न्यायालयात २८ मे २०२१ रोजी या खटल्याची सुनावणी झाली. सुनिल याच्याविरुद्ध नारपोलीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय बेंडे यांनी सक्षम पुरावे न्यायालयात सादर केले. यात सख्या भावानेच भावाचा खून केला होता. तर फिर्यादी ही आरोपीची आई आहे. खटल्याच्या सुनावणी दरम्यान फिर्यादी फितूर झाली असतांनाही उत्कृष्ट तपासामुळे तसेच न्यायालयात इतर साक्षीपुरावे चांगल्या प्रकारे मांडण्यात पोलिसांना यश आले. पोलीस उपनिरीक्षक गोरडे, लेखनिक कारकून इशी, पैरवी अधिकारी जाधव आणि पाचेगावकर यांनी खटल्यात साक्षी पुरावे गोळा करण्यासाठी उत्तम कामगिरी पार पाडली. सरकारी वकील म्हणून विवेक कडू यांनी आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी जोरदार बाजू मांडली. त्यामुळेच या सर्व बाबी ग्राहय धरुन न्या. आर. एम. जोशी यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली.* काय घडला होता प्रकार-भिवंडीतील नारपोली येथे १२ आॅक्टोबर २०१७ रोजी देवजीनगर येथील शिवसेना कार्यालयाजवळ आकाश याने सुनिलकडे दारुसाठी पैसे मागितले होते. ते त्याने दिले नाही म्हणून शिवीगाळ केली. याचाच राग आल्यामुळे सुनिलने घरातील लाकडी दांडक्याने आकाशच्या डोक्यावर, कपाळावर आणि मानेवर मारहाण केली होती. यात गंभीर जखमी झालेल्या आकाशचा मृत्यु झाला होता. त्यामुळेच आईनेच खूनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालयMaharashtraमहाराष्ट्र