शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

ग्रंथालयांनी परिवर्तन करण्याची गरज - राम नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:16 IST

आजच्या काळात आधुनिक साधनांद्वारे आपल्यावर माहितीचा मारा होत आहे. सोशल मीडियाद्वारे एका क्लिकवर माहिती मिळते. यामुळे ज्ञानाचे भांडार असलेली ग्रंथालये कालबाह्यहोतात की काय, अशी भीती निर्माण होऊ लागली आहे.

ठाणे : आजच्या काळात आधुनिक साधनांद्वारे आपल्यावर माहितीचा मारा होत आहे. सोशल मीडियाद्वारे एका क्लिकवर माहिती मिळते. यामुळे ज्ञानाचे भांडार असलेली ग्रंथालये कालबाह्यहोतात की काय, अशी भीती निर्माण होऊ लागली आहे. मात्र, ग्रंथालये ही कालबाह्यहोऊ शकत नाहीत. केवळ त्यांनी कालानुरूप परिवर्तन करण्याची गरज आहे. जे परिवर्तन करतील, ते कालौघात टिकतील, असे मत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केले. यावेळी विजेच्या लपंडावाने राज्यपालांच्या कार्यक्रमात व्यत्यय आणला.मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे या संस्थेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा शुक्रवारी सायंकाळी गडकरी रंगायतन येथे रंगला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. वाचाल तर वाचाल, असे म्हटले जाते. मात्र, पुस्तके किती जण वाचतात आणि वाचनसंस्कृती रुजणार कशी, हा यक्षप्रश्न आहे. मोबाइल, इंटरनेटवर रुळलेल्या तरुण पिढीला वाचनाकडे आकर्षित करणे, हे आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जाताना ग्रंथालयांनी ग्रंथव्यवहार आधुनिक पद्धतीचे आणि समृद्ध केले पाहिजे. विशेष म्हणजे मराठी ग्रंथसंग्रहालयाने डिजिटलायझेशनची प्रक्रिया हाती घेऊन आधुनिकीकरणाकडे वाटचाल केली आहे, असे नाईक यावेळी म्हणाले. यावेळी नाईक यांनी स्वत: लिहिलेल्या चरैवेति! चरैवेति ! या आपल्या पुस्तकाचा संच संग्रहालयाला भेट दिला.या कार्यक्रमाला खासदार विनय सहस्रबुद्धे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, महाराष्टÑ राज्य ग्रंथालयांचे संचालक किरण धारोंडे तसेच संग्रहालयाचे विद्याधर वालावलकर, संजीव ब्रह्मे, दा.कृ. सोमण, विद्याधर ठाणेकर, मा.य. गोखले उपस्थित होते. यावेळी राज्यस्तरीय श्रीस्थानक साहित्य पुरस्कार तसेच जिल्हास्तरीय अ‍ॅड. वा.अ. रेगे वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.वीजपुरवठा खंडितमराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सांगता सोहळ्यात काही वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता. कार्यक्र म सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे आणि कार्यक्र म सुरू असताना साधारण दोनतीन मिनिटे वीज गेली होती. त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, आधीच दिवसभर विजेचा लपंडाव सुरू असल्याने जनरेटरवरही लोड आला होता. त्यामुळे ते सुरू होऊन वीजप्रवाह सुरळीत व्हायला काही वेळ लागला, अशी माहिती रंगायतनमधील व्यवस्थापकांनी दिली.

टॅग्स :Ram Naikराम नाईक