निवडणुकीत शिवसेनेला ‘चिल्लर’ मोजायला लावू , सकल मराठा मोर्चाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 11:40 PM2019-08-21T23:40:55+5:302019-08-21T23:41:15+5:30

शिवशिल्पाच्या दुर स्तीमध्ये ठामपाकडून दिरंगाई केली जात आहे. यासंदर्भात निवेदन देण्यासाठी गेलेल्या सकल मराठा समाजाच्या मंगळवारी पदाधिका-यांना नरेश म्हस्के यांनी ‘चिल्लर’ असे संबोधून धक्काबुक्की केली होती.

Let the Shiv Sena be a 'chiller' in the elections, a hint of sakal Maratha morcha | निवडणुकीत शिवसेनेला ‘चिल्लर’ मोजायला लावू , सकल मराठा मोर्चाचा इशारा

निवडणुकीत शिवसेनेला ‘चिल्लर’ मोजायला लावू , सकल मराठा मोर्चाचा इशारा

Next

ठाणे : ठामपाचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी ‘हिम्मत असेल तर आयुक्तांकडे जा’ असे आव्हान मराठ्यांना दिले होते. आम्ही आमची हिम्मत दाखवून शिवशिल्पासाठी १० लाखांचा निधी मंजूर करून घेतला. पण, त्यानिमित्ताने शिवरायांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांची किंमत समस्त ठाणेकरांना दिसली, अशा शब्दांत सकल मराठा समाजाने पलटवार केला आहे. शिवाय, समाजातील पदाधिकाऱ्यांना चिल्लर लेखणाºया म्हस्केंनी माफी मागावी, अन्यथा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेलाच चिल्लर मोजायला लावू, असा इशाराही बुधवारी मराठा समाजाच्या पदाधिका-यांनी दिला.
शिवशिल्पाच्या दुर स्तीमध्ये ठामपाकडून दिरंगाई केली जात आहे. यासंदर्भात निवेदन देण्यासाठी गेलेल्या सकल मराठा समाजाच्या मंगळवारी पदाधिका-यांना नरेश म्हस्के यांनी ‘चिल्लर’ असे संबोधून धक्काबुक्की केली होती. त्यानंतर, या पदाधिकाºयांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन या शिवशिल्पासाठी निधी मंजूर करून घेतला. यासंदर्भात मराठा मोर्चाची भूमिका मांडण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत कैलाश म्हापदी यांनी ही टीका केली. यावेळी रमेश आंबरे, अ‍ॅड. संतोष सूर्यराव, दत्ता चव्हाण, अविनाश पवार, अजय सकपाळ, दीपक पालांडे, धनंजय समुद्रे, प्रवीण कदम, सुजय हुले, अतुल मालुसरे आदी उपस्थित होते.
शिवरायांचे नाव घेऊन सत्तेवर येणाºया या लोकांना आपल्या नजरेसमोर पडझड झालेले शिवशिल्प दिसत नाही, हे दुर्दैव आहे. प्रशासनाकडून काम करून घेणे, हे त्यांचे कर्तव्य असते. मात्र, ते जमत नसल्यामुळेच सनदशीर आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करणाºयांना मारहाण करण्याची धमकी दिली जात आहे. सर्वात गंभीर म्हणजे महापौरांना भेटण्यासाठी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी गेले असताना त्यांच्या दालनात येऊन अशा पद्धतीने दादागिरी करणे सभागृह नेत्याला शोभणारे नाही.
आम्ही शिवशिल्पाच्या दुरु स्तीची मागणी करायला गेलो होतो. मात्र, त्यांनी ही मागणी जाणून घेण्याआधीच हाणामारीची भाषा केली. यावरून या लोकांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल किती प्रेम आहे, हे दिसून येत आहे. मते मागण्यासाठी मराठा समाजाच्या दारात भिकाºयासारखे येणारे हे लोक आज शिवरायांच्या वैचारिक वारसांना ‘चिल्लर’ असे म्हणत असतील, तर त्याचा हिशेब आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चुकता केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे म्हस्के यांनी माफी मागावी, असेही त्यांनी सांगितले.
दुसरीकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली होती. परंतु, त्यांनी दिलेली शपथ आता सुटली असून त्यांच्याबरोबर आमचा काहीही संबंध असणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

...तर सहीसलामत गेले नसते
नरेश म्हस्के यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले असून मराठा समाजाविषयी कोणत्याही प्रकारचे अनुद्गार काढले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी चिल्लर असा उल्लेखदेखील केला नव्हता. कैलाश म्हापदी यांनी माझ्या प्रभागात येऊन माझ्या आणि शिवसेनेच्या विरोधात अनेक भाषणे केली आहेत. मात्र, सर्वांचे डिपॉझिट जप्त करून मी निवडून आलो आहे. महिला असलेल्या महापौरांना चिल्लर देणे योग्य नसून जर असे केले असते, तर ते दालनाच्या बाहेर सहीसलामत गेलेच नसते. या माझ्या वक्तव्यावर मी आजही ठाम असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Let the Shiv Sena be a 'chiller' in the elections, a hint of sakal Maratha morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे