शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

हेवेदावे विसरून काँग्रेस पक्षाला द्या बळकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 04:53 IST

बी.एम. संदीप : डोंबिवलीत पक्षाचा मेळावा, सत्ताधारी भाजपावर केली टीका

डोंबिवली : आपापसांतील हेवेदावे कमी करून काँग्रेसला बळकटी मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. सत्ता मिळवण्यासाठी सर्वांनी मन लावून काम करावे, असे आवाहन पक्षाचे सचिव बी.एम. संदीप यांनी डोंबिवलीत केले. काँग्रेसच्या शक्ती अ‍ॅपची माहिती कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना देण्यासाठी पक्षातर्फे शनिवारी पूर्वेतील सर्वेश सभागृहात मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख पदाधिकाºयांची बैठकही झाली. याप्रसंगी पक्षाचे निरीक्षक राजेश शर्मा, राजन भोसले आदी उपस्थित होते.

संदीप पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार हे भ्रष्टाचारी आहे. चार वर्षांत त्यांनी विशेष काहीच केले नाही. आधारकार्ड तसेच अन्य योजनाही काँग्रेस सरकारच्या काळातील आहेत. भाजपाने विजय मल्ल्या, नीरव मोदी आदींना मोठे केले. राफेल घोटाळा हा देखील त्याचेच एक उदाहरण आहे. नागरिकांनी सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये. तसेच पक्षांतर्गत गटबाजी, दुफळी, हेवेदावे असता कामा नयेत. कार्यकर्त्यांनी, पदाधिकाºयांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.काँग्रेसचे केडीएमसीतील गटनेते नंदू म्हात्रे, पप्पू भोईर, नगरसेविका हर्षदा भोईर, माजी नगरसेवक नवीन सिंग, सचिन पोटे, संतोष केणे, रवी पाटील, अमित म्हात्रे, कांचन कुलकर्णी, राहुल काटकर, गंगाराम शेलार, एकनाथ म्हात्रे, शारदा पाटील, वर्षा गुजर, दीप्ती जोशी, वर्षा शिखरे, मीना सिंग, सदाशिव शेलार, दर्शना शेलार उपस्थित होते.शक्ती अ‍ॅप नागरिकांपर्यंत पोहोचवावेच्शक्ती अ‍ॅप कार्यकर्त्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचवावे. काँग्रेसने देशाच्या उभारणीसाठी दिलेल्या योगदानाची माहिती द्यावी. अ‍ॅपद्वारे नागरिकांना थेट पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.च्गांधी हे नागरिकांकडून समस्या आणि अपेक्षा जाणून घेणार आहेत. तसेच ते बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे जास्तीतजास्त नागरिकांना अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगावे. तसेच काँग्रेसला मत देण्याचे आवाहन करावे, असे सांगण्यात आले.

टॅग्स :congressकाँग्रेसthaneठाणे