शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गज साहित्यिकांच्या कथांची मेजवानी

By admin | Updated: February 11, 2017 03:52 IST

रविवारी पार पडलेल्या ३१० क्रमांकाच्या अभिनय कट्ट्याचे या वेळी विशेष आकर्षण ठरले ते ‘माणदेशी माणसं’, ‘कर्मचारी’, ‘चौथे चिमणराव’ ‘भोकरवाडीच्या गोष्टी’ या कथासंग्रहांवर आधारित ‘द्विपात्रींचे सादरीकरण’.

ठाणे : रविवारी पार पडलेल्या ३१० क्रमांकाच्या अभिनय कट्ट्याचे या वेळी विशेष आकर्षण ठरले ते ‘माणदेशी माणसं’, ‘कर्मचारी’, ‘चौथे चिमणराव’ ‘भोकरवाडीच्या गोष्टी’ या कथासंग्रहांवर आधारित ‘द्विपात्रींचे सादरीकरण’. तेजस शिद्रुक याने ‘घोस्ट नेक्स्ट टू माय डोअर’, मंगेश सस्ते यांनी ‘चमचा’, शुभांगी गजरे हिने ‘आजीबाईची ‘वर्ल्ड टूर आणि डान्स’, रुक्मिणी कदम यांनी ‘राधाई’ व बालकलाकार सई कदम हिने ‘काम करा काम’ या एकपात्रीचे सादारीकरण सुरुवातीला कट्ट्याच्या कलाकारांनी केले. त्यानंतर, द्विपात्री सादरीकरणाला सुरु वात झाली. त्यामध्ये शुभांगी गजरे व अर्चना वाघमारे यांनी द.मा. मिरासदार यांच्या ‘भोकरवाडीच्या गोष्टी’ या कथासंग्रहातील ‘बबीचे मंगळसूत्र’ या कथेवर धमाल सादरीकरण केले. त्यांच्याच ‘खव्याचा गोळा’ या गमतीशीर कथेचे सादरीकरण रु क्मिणी कदम, श्रावणी कदम व वीणा छत्रे यांनी केले. व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘माणदेशी माणसं’ या कथासंग्रहातील ‘मुलाण्याचा बकस’ या कथेवर सादरीकरण नवनाथ कंचार व मयूर जाधव यांनी केले. लेखक व वेडसर पण निष्पाप असा अल्लाबक्ष अर्थात बकस यांच्यातील नात्याचे सुंदर चित्रण या कथेत आहे. व.पु. काळे यांच्या ‘कर्मचारी’ या कथासंग्रहातील ‘जोशी’ या कथेचे सादरीकरण कल्पेश डुकरे व दीपक मुळीक यांनी केले. भांडकुदळ म्हणून व तिरकस उत्तरांसाठी प्रसिद्ध असणारे जोशी आणि त्यांच्या तिरक्या व भांडकुदळ स्वभावाचे चित्रण या विनोदी अंगाने जाणाऱ्या कथेत आहे. चि.वि. जोशी यांच्या ‘चौथे चिमणराव’ या कथासंग्रहातील ‘माझी पीएच.डी. का हुकली’ या विनोदी कथेचे सादरीकरण प्रणव दळवी व शुभम चव्हाण यांनी केले. प्रशांत सकपाळ व महेश वर्मा यांनी ‘अनामिक’, रोहिणी राठोड, वैभवी वंजारे यांनी ‘कर्मचारी’, संकेत देशपांडे व योगेश मंडलिक यांनी ‘गणा महार’, अनिल काळेल व हितेश नेमाडे यांनी ‘पाठलाग’चे सादरीकरण केले. आज स्पेशल काय, या सदरामध्ये नवनाथ कंचार याने ‘रणांगण’ नाटकातील सदाशिवरावभाऊ पेशव्यांचा प्रवेश, हितेश नेमाडे याने ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेतील अफझलखान वधाच्या आधी शिवाजी महाराजांचा भवानीमातेशी संवाद साधणारा प्रसंग सादर केला. (प्रतिनिधी)