शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

लीला श्रोती यांना अखेर ठाणे गौरव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 17:40 IST

ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गुणीजन पुरस्काराच्या नावाने पुरस्कारांचे खिरापत वाटली जाते. यंदा देखील तसाच काही प्रकार घडला होता. या गुणीजन पुरस्कारात संस्कृत विषयात पारंगत असलेल्या एका 93 वर्षीय शिक्षिकेचा देखील समावेश करण्यात आल्याने तो वादाचा मुद्दा झाला होता.

ठाणे - ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गुणीजन पुरस्काराच्या नावाने पुरस्कारांचे खिरापत वाटली जाते. यंदा देखील तसाच काही प्रकार घडला होता. या गुणीजन पुरस्कारात संस्कृत विषयात पारंगत असलेल्या एका 93 वर्षीय शिक्षिकेचा देखील समावेश करण्यात आल्याने तो वादाचा मुद्दा झाला होता. तसेच, या संदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द होताच, महापौरांनी यात मध्यस्ती करुन या शिक्षिकेला आता ठाणे गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.         मागील वर्षी प्रमाणे यंदा पुन्हा पालिकेकडून दिल्या पुरस्काराच्या मुद्यावरुन हा वर्धापन दिनात पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. महापौर कार्यालयाकडे पुरस्कारासाठी लेखी शिफारशींचा खच पडला होता. यामध्ये नगरसेवकांनी शिफारस केलेल्या इच्छुकांची संख्या अधिक होती. तसेच नको त्यांना आणि नगरसेवकांच्या नातेवाईंकांनाच पुरस्कार देण्यासाठी नगरसेवकांनी फिल्डिंग लावल्याचेही दिसून आले. यामध्ये गुणीजन पुरस्कार हा अतिशय वादादीत ठरलेला मुद्दा होता. यंदा देखील अनेकांना याची खैरात देण्यात येणार होती. याच पुरस्कारात ठाण्यातील लीला श्रोती यांना ठाणे भूषण अथवा गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकाने शिफारस पत्र दिले होते. विशेष म्हणजे यामध्ये श्रोती यांनी केलेले संपूर्ण कार्य देखील त्यांनी विषद केले होते. श्रोती या शिक्षिका असून वयाच्या 90 व्या वर्षी देखील बाह्यपरीक्षांची भूमिका बजावत असून, त्यांच्या तालमीत संस्कृतमध्ये अनेकांनी प्रतितयश संपादन केले आहे. काही संस्थांनी देखील त्यांचा नुकताच गौरव केला आहे. परंतु या शिक्षिकेचा समावेश देखील गुणीजन पुरस्कारात करण्यात आला होता. तसे सुरवातीला पत्रही तयार झाले होते. परंतु या संदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द होताच, महापौर मीनाक्षी शिंदे यांची दखल घेत, त्यांचा योग्य तो सन्मान केला आहे. बुधवारी त्यांना ठाणे गौरव हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका