शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सुटीचा निरोप देण्यात ‘लेटमार्क’, विद्यार्थी-पालकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:47 IST

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांना मंगळवारी सकाळी उशिराने सुटी जाहीर केली. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आल्या, मात्र खासगी शाळापर्यंत निरोप न पोहचल्याने त्यांच्या सुटीचा घोळ झाला.

ठाणे - अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांना मंगळवारी सकाळी उशिराने सुटी जाहीर केली. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आल्या, मात्र खासगी शाळापर्यंत निरोप न पोहचल्याने त्यांच्या सुटीचा घोळ झाला. यामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जिप शाळांना निरोप गेला असला तरी शाळेत पोहचलेल्या विद्यार्थ्यांना घरी सुखरूप पोहचवण्याची जबाबदारी कुणीच घेतली नसल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. यामुळे यास जबाबदार कोण असा प्रश्न आता करण्यात येत आहे.जिल्हा प्रशासनाला अतिवृष्टीचा अंदाज नव्हता का, हवामान खात्याने १५ जुलैपर्यंत मुंबईसह ठाणे-रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा दिलेला इशारा जिल्हा प्रशासनाला माहीत नव्हता का, सुटी जाहिर केल्यानंतर तिचा निरोप खासगी शाळांपर्यंत न पोहचल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे हाल झाले. अनेक शाळांचा सकाळचे सोडाच दुपारचे सत्र सुरू झाले तरी सुटीचा निरोप न पोहचल्याने त्यांचा सुटी घोळ झाला.दरम्यान, जिल्ह्यात संततधार पावसामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये याबाबत मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी पालक शिक्षक संघ स्थानिक शाळा समितीच्या मदतीने उपाययोजना कराव्या, तसेच कोणीही मुख्यालय सोडू नये अशी तंबी शिक्षण विभागाने दिली. आपत्कालीन बाबींसाठी तालुका वा शहराच्या आपत्कालीन कक्षाच्या संपर्कात राहण्याचे आदेश दिले. अफवांवर विश्र्वास ठेवू नये असे ठाणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बडे मंगळवारी सकाळी उशिरा आदेश जारी केले. सुटीचा संदेश विद्यार्थ्यांना तत्काळ पोहचविण्यासाठी शाळांनी ग्रामस्थ, पालकांशी लगेचच संपर्क करावा. सर्व शिक्षक वेळेत शाळेत जातील व शाळेत कुणी विद्यार्थी आलेले नाहीत वा विद्यार्थी आले तर त्यांना सुखरूप घरी पोहचवून तशी खात्री करतील, आजचा शालेय कामकाजाचा दिवस पुढील काळात भरण्यात यावा, मंगळवारी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल केंद्रप्रमुखांकडे देण्याच्या सूचना आहेत.केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळांचा आढावा घेऊन शिक्षण विभागाकडे रिपोर्ट करावा. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. केंद्रप्रमुख, शिक्षक यांनी मुख्यालय सोडू नये आदी सूचना शिक्षण विभागाने तडकाफडकी जाहीर करून सुटी जाहीर केली.

टॅग्स :SchoolशाळाRainपाऊस