शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

"किमान त्यांना सामनाचे संपादकपद तरी द्यायला हवे होते; संजय राऊत यांच्यावर अन्याय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 05:08 IST

किमान त्यांना सामनाचे संपादकपद तरी द्यायला हवे होते, असे मत व्यक्त करून आठवले यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला.

ठाणे : दिल्लीच्या दंगलीला काँग्रेस आणि आप हे दोन पक्षच जबाबदार आहे. त्यांनी ठरवले असते, तर ही दंगल थांबवू शकले असते, असा आरोप रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांनी रविवारी ठाण्यात एका खाजगी कार्यक्रमात केला. ज्या संजय राऊत यांच्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले, त्यांच्यावरच पक्षाने अन्याय केला. किमान त्यांना सामनाचे संपादकपद तरी द्यायला हवे होते, असे मत व्यक्त करून आठवले यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला.राज ठाकरे यांनी प्रांतवादाची भूमिका सोडली, तर त्यांचे महायुतीत स्वागत आहे. परंतु, ते येण्या न येण्याने महायुतीला काही फरक पडणार नाही, असा दावा आठवले यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केला. दिल्लीत दंगल आधी आपच्या नगरसेवकाने भडकवली.त्यानंतर काँग्रेसने ती आणखी भडकवल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्रात आमचे सरकार असल्याने दंगलीसाठी आम्ही कसे जबाबदार, असा सवालही त्यांनी केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीबद्दल त्यांनी सांगितले की, रिपाइंचा लवकरच मेळावा होणार आहे. मुंबई महानगरपालिकेत रिपाइं पूर्ण ताकदीने भाजपसोबत राहून शिवसेनेला पराभूत करणार आहे. मुंबईचा २०२२ चा महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्यास रिपाइंचा विरोध असून कोणत्याच भागाचे जुने नाव बदलले जाऊ नये, असे पक्षाला वाटते. मात्र, राज्य शासनाने ठरविले तर नावात बदल केला जाऊ शकतो, असे ते यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेSanjay Rautसंजय राऊत