शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वकील फरहान अन्सारी ठरले देवदूत; ऑक्सिजनचे ३५ सिलिंडर्स बाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 23:37 IST

भावासह गाठले रुग्णालय : ऑक्सिजनचे ३५ सिलिंडर्स बाहेर काढले

ठाणे : मुंब्य्रातील प्राइम क्रिटिकेअर केअर रुग्णालयाला बुधवारी पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु, यामध्येही मुंब्य्रातील ॲड. फरहान अन्सारी हे देवदूत ठरले आहेत. 

रुग्णालयाजवळ राहणारे अन्सारी रमजान असल्याने पहाटे नमाज अदा करण्यासाठी उठले असता त्यांनी आपल्या घराच्या खिडकीतून रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या लाटा पाहून तातडीने आपल्या भावासह रुग्णालय गाठून वॉर्डमधील खिडकीचे ग्रील रॉडने तोडून ९ रुग्णांना तातडीने बाहेर काढून त्यांचा जीव वाचविला.  त्याचबरोबर वाय इतर सहकाऱ्यांच्या सोबत रुग्णालयात असलेले ऑक्सिजनचे ३५ सिलिंडर्सदेखील बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यामुळेच फरहान या रुग्णांसाठी रमजानच्या पवित्र महिन्यात देवदूत ठरले.

मुंब्य्रातील प्राइम केअर रुग्णालयाला पहाटे ३.४० च्या सुमारास शॉर्कसर्किटमुळे भीषण आग लागली. त्याच वेळेस अन्सारी हे नमाज अदा करण्यासाठी उठले होते. त्यावेळेस त्यांची नजर खिडकीसमोरील हॉस्पिटलकडे केली. त्यांनी लागलीच आपल्या भावांना सोबत घेऊन रुग्णालय गाठले. आतून आवाज येत होता, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा, धुरांचे लोळ उडत होते.  त्यामुळे काय करावे, रुग्णांना बाहेर कसे काढावे, असा प्रश्न त्याला सतावत होता. परंतु, क्षणाचाही विचार न करता त्यांनी रुग्णालयाच्या मागील बाजूस वॉर्डमधील भिंतीच्या खिडकीचे ग्रील तोडून सुरुवातीला तीन रुग्णांना बाहेर काढले. त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आणखी पाच जणांना त्यांनी बाहेर काढले.  मात्र, सर्व या घटनेमुळे रुग्ण घाबरलेले होते, धुरामुळे त्यांना दम लागत होता, श्वास कोंडला होता. त्यामुळे त्यांना बाहेर काढणे हाच आमचा विचार सुरू होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

टॅग्स :fireआगthaneठाणे