शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या आमिषाने सव्वा लाखाचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:44 IST

वधूवर सूचक संकेतस्थळावरून एका ३४ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने तिच्याकडून सव्वा लाख रुपये उकळणा-या इसिदाहोमेन ख्रिस्टीयन (२३) या नायजेरियन भामट्याला...

ठाणे : वधूवर सूचक संकेतस्थळावरून एका ३४ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने तिच्याकडून सव्वा लाख रुपये उकळणाºया इसिदाहोमेन ख्रिस्टीयन (२३) या नायजेरियन भामट्याला ठाणे पोलिसांनी थेट दिल्ली येथून बुधवारी अटक केली. त्याला ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.ठाण्याच्या पोखरण रोड क्रमांक-१ येथे राहणाºया या महिलेची इसिदाहोमेन याने ‘जैन मॅट्रोमेनी’ या वधूवर सूचक संकेतस्थळावरून माहिती काढली. त्यानंतर, त्याने आपली आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे भासवून तिला बºयाच भूलथापा देऊन तिला लग्नाची मागणी घातली. एक चांगले स्थळ आल्याचा समज झाल्याने तिनेही त्याला तशी संमती दिली. पण, आधी चांगली ओळख होण्यासाठी ती त्याच्याशी फोन आणि नेटच्या माध्यमातून संपर्कात आली. तिच्याशी चांगल्या प्रकारे मैत्री केल्यानंतर त्याने तिचा विश्वास संपादन केला. हीच संधी साधून त्याने तिला एक गिफ्ट पाठवायचे असल्याचे सांगितले. हे गिफ्ट पार्सलने पाठवायचे असल्यामुळे उत्पादन शुल्क भरावे लागेल, अशी बतावणी करून गिफ्टमध्ये पाउंडच्या स्वरूपात ब्रिटिश चलन पाठवत असल्याचेही त्याने सांगितले. त्याच नावाखाली त्याने सप्टेंबर ते ३० आॅक्टोबर २०१७ या कालावधीत तिच्याकडून आॅनलाइन बँकिंगमार्फत एक लाख २७ हजार ८९९ रुपये इतकी रक्कम घेतली. अर्थात, इतके पैसे घेऊनही तिला कोणत्याही प्रकारचे पार्सल किंवा त्याच्याकडून परकीय चलनही त्याने पाठवले नाही. शिवाय, तिचे पैसे मिळाल्यानंतर त्याने तिच्याशी संपर्कही तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने याप्रकरणी ३० नोव्हेंबर २०१७ रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) नुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crimeगुन्हा