शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई ठाण्यातील सर्व सामान्यांसाठी उपनगरी रेल्वे सुरु करा: रेल्वे राज्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 00:18 IST

सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरी रेल्वे (लोकल) सेवाही सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयानेच पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे.

ठळक मुद्दे नगरसेवक संजय वाघुले यांनी दिले निवेदनरेल्वे मंत्रालयाने पुढाकार घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणेरेल्वे स्थानकातील पूर्व आणि पश्चिम बाजूकडील विविध समस्या सोडविण्यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी साकडे घातले आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरी रेल्वे (लोकल) सेवाही सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयानेच पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांसंदर्भात नगरसेवक वाघुले यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची दिल्लीत रविवारी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. सामान्य रेल्वे प्रवाशांना लोकलसेवा सुरू करावी, सायंकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत ठाणे ते बदलापूर आणि ठाणे ते टिटवाळा ही लोकल सुरु करावी. घाटकोपर रेल्वे स्थानकात मेट्रोमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन कुर्ला किंवा घाटकोपर येथून लोकलसेवा सुरू करावी, फलाट क्रमांक एक ते बी कॅबीन रोडच्या दुचाकी वाहनांसाठी रु ंदीकरण करावे, ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवेशाच्या चार ठिकाणी प्रवाशांसाठीचे सुविधा फलक लावले जावेत. फलाट क्रमांक एक वरील बुक स्टॉलसह तिकिट खिडकीसमोर साचणाऱ्या पाण्याचा निचरा करावा, पुरु ष आणि महिला प्रवाशांसाठी वेटिंग रूम सुरू करावी, रेल्वे पोलिसांसाठी प्रतिक्षा कक्ष असावा. बंद असलेली वातानुकुलित डॉरमेटरी सुविधाही सुरू करावी, रेल्वे स्थानकात अद्ययावत घोषणा प्रणाली बसवावी, ठाणे पूर्व स्थानकाबाहेर चार चाकी आणि दुचाकी वाहनांसाठी वाहनतळ तयार करून परिसराचे सुशोभिकरण करावे आणि रेल्वे फलाटावरील विद्युत यंत्रणा सोलरवर सुरू करावी, आदी मागण्या नगरसेवक वाघुले यांनी केल्या आहेत. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन राज्यमंत्री दानवे यांनी दिले.* यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासमवेत सुरेश पाटील, संजय चौधरी, सचिन मेधाने, कैलास खारे, मनोज विश्वकर्मा आणि हर्षराज नारंग आदीही उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वे