शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मागील पाच वर्षे उद्योजकांसाठी पूरक तर शेतकऱ्यांसाठी ठरली मारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 05:00 IST

शेतकऱ्यांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे बांधावरून रिपोर्टिंग

उद्योजकांना सवलती, कृषी योजनांना कात्रीमोदी सरकारने आपल्या कार्यकाळात उद्योजकांवर सवलतीचा पाऊस पाडला, मात्र कृषी क्षेत्रात आणि शेतकरी यांना वाºयावर सोडले आहे. उद्योजकांना कोट्यावधींचे कर्ज माफ केले जात आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परत फेडीसाठी बँका, विविध सहकारी सोसायटी तगादा लाऊन मानसिक त्रास देतात. त्यामुळे आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी कुटुंबांची परिस्थिती बिकट झाली आहे. सरकारने कृषी व शेतकºयांना न्याय दिला पाहिजे. शेतकºयाला आर्थिक संकटातून बाहेर काढले पाहिजे.- बाळू चौधरी, कोशिंबे, भिवंडीकृषी विभागाच्या योजनांचा लाभसरकारच्या विविध योजनांचा लाभ शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिकांना मिळाला आहे. मुद्रा योजना, विमा कृषी, रोजगार निर्मिती, रोजगार हमी योजना, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्न, सिंचन योजनांचा लाभ नागरिकांनी घेतला आहे. शिक्षणाकरिता अधिक तुकड्यांना शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे येथील सर्वसामान्य माणसेही समाधानी आहेत. शेतकºयांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ काही प्रमाणात मिळाला आहे. त्या मोठ्या प्रमाणात मिळणे आवश्यक आहे- राजू चौधरी, मराडेपाडा, भिवंडी.योजना सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचेकेंद्र व राज्य सरकारने अनेक योजना आणल्या. मी माझ्या शेतावर सरकारी योजनेमधून विहीर खोदून कृषीपंप बसवला आहे. भातपिकासह भाजीपाला पिकवतो. गावातील नागरिकांना पाणी पुरवले जाते. वीटभट्टी व्यवसायही त्यावर सुरू आहे. भेंडी, गवार, ढोबळी मिरची या भाजीपाला पिकांसह झेंडू, मोगरा यांची लागवड केल्याने त्याचा फायदा मला झाला. सरकारच्या असलेल्या योजना सर्व शेतकºयांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्या पोहचल्या तरच शेतकरी खºया अर्थाने समाधानी होईल.- महादू घोडविंदे, सूर्यानगर, भिवंडीयोजना राबविण्यातमोदी सरकार अपयशीदेशातील जास्तीतजास्त नागरिक हे शेतीवर अवलंबून आहेत. मोदी सरकारने शेती व्यवसायासाठी पूरक योजना आणल्या नाहीत. ग्रामीण भागातील शेतकºयांचा फायदा होईल अशी कोणतीच योजना या सरकारने आणली नाही. शेतीमालाला हमीभाव देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. कर्जमाफीची योजना राबवली पण त्या योजनेची अंमलबजावणी पूर्ण झालेली नाही. मोठ्या योजनांमध्ये एका विशिष्ट वर्गाने भ्रष्टाचारी मार्गाने खूप पैसा कमवलाआहे. एकंदरीत पाच वर्षे मोठ्या उद्योजकांसाठी पूरक ठरली आहेत व शेतकºयांसाठी मारक. - सुरेश देसले, अवलोटे, भिवंडीहमीभाव न मिळाल्याने शेतकरी नाराजशेतमालाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने तो नाराज आहे. शेतकºयांना लागणारी अवजारे, त्यासाठी असणाºया योजना या शेतकºयांपर्यंत पोहचायला हव्यात. मात्र अशा कोणत्याही योजना गरीब शेतकºयांपर्यंत पोहचतच नाहीत. भिवंडी तालुका कृषी कार्यालय व भिवंडी पंचायत समिती कृषी विभागाच्या योजना अधिकारी, पर्यवेक्षक धनदांडग्या शेतकºयांना लाभ देत असल्याने गरीब शेतकºयांना फायदा होत नाही. त्यामुळे आम्हा शेतकºयांना ही सवलत मिळत नाहीत. .- महेंद्र भोईर, शेडगाव, भिवंडी 

टॅग्स :FarmerशेतकरीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूक