शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

अवघ्या सव्वाचार महिन्यांत जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे ११ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:38 IST

उष्णतेचा पारा एकीकडे वाढत असताना दुसरीकडे जिल्ह्यात मे महिन्यात स्वाइन फ्लूबाधितांची संख्या १४ दिवसांत १९ ने वाढली आहे.

ठाणे : उष्णतेचा पारा एकीकडे वाढत असताना दुसरीकडे जिल्ह्यात मे महिन्यात स्वाइन फ्लूबाधितांची संख्या १४ दिवसांत १९ ने वाढली आहे. तर, २३ एप्रिल ते १४ मे दरम्यान पाच जण दगावल्याची माहिती पुढे आल्याने जानेवारी ते १४ मे या सव्वाचार महिन्यांत ११ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसत आहे. गतवर्षात या काळात एकाचाही स्वाइन फ्लूने मृत्यू सोडा, पण एकही बाधित रुग्ण आढळला नसल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.ठाणे जिल्ह्यात १ जानेवारी ते १४ मे २०१९ या कालावधीत स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झालेल्या रु ग्णांचा आकडा १६७ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत कार्यान्वित असलेल्या एकूण १० वॉर्डांमध्ये याचदरम्यान ४१ हजार १४७ जणांची तपासणी केली. यामध्ये २८ हजार ३७९ नवी मुंबईकरांनी तपासणी करून आघाडी घेतली आहे. मात्र, एकही जण दगावला नसून अवघे १६ रुग्ण बाधित असल्याचे पुढे आले. त्यातील दोन उपचारार्थ दाखल असून १३ जणांना घरी सोडण्यात आले. यापाठोपाठ ठाणे जिल्हा रु ग्णालयात चार हजार ६५० जणांनी तपासणी केली. उल्हासनगर येथे तीन हजार ५४७, ठामपा दोन हजार ४५४, मीरा-भार्इंदर एक हजार ५२०, भिवंडीत ३४५ आणि सर्वात कमी केडीएमसी येथे २४३ जणांनी तपासणी केली आहे.उल्हासनगरसह भिवंडीतएकही रुग्ण नाहीजिल्ह्यातील एकूण ४१ हजार १४७ जणांच्या तपासणीत १७७ संशयित रु ग्ण म्हणून पुढे आल्यावर त्यापैकी १६७ जणांना स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले.यामध्ये ठामपा हद्दीत सर्वाधित ८६, त्यानंतर मीरा-भार्इंदर ३७, कल्याण २६ आणि नवी मुंबई १६ तसेच जिल्हा रु ग्णालयात दोन रु ग्णांचा समावेश आहे. उल्हासनगर तसेच भिवंडी महापालिका हद्दीत अद्याप एकही रु ग्ण आढळून आला नाही.आतापर्यंत १३४ जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. यामध्ये ठामपाच्या हद्दीतील ८१, मीरा-भार्इंदर ३३, नवी मुंबई १३, कल्याण सात रुग्णांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लू